कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत मोठं विधान केलं. “विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. “जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत’.” असे पवार यांनी यावेळी म्हंटले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जन्मगाव असलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा मोहिमेची काल समारोप सभा पार पडली. यानंतर आज शरद पवार जात असताना त्यांनी कराड येथे माध्यमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झालय. उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल.
बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील, आम्हाला सांगण्यात आले आहे. ” मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल बोलत आहेत. लोकसभेला त्यांचा मोठा फटका बसला. यावर ‘निर्णय तर होऊ द्या, निर्णय झाल्यावर मग बोलता येईल’ असे उत्तर शरद पवार यांनी दिले.