शरद पवार शुक्रवारी साताऱ्यात, चाचपणी करुन लोकसभेच्या उमेदवाराची करणार घोषणा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण देखील चांगलच तापले आहे. हे वातावरण तापवायला अनेक घडामोडी सद्या सातारा जिल्ह्यात घडत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी तसेच महायुतीचाही सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी साताऱ्याला धावती भेट देणार आहेत. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारीची  चाचपणी करणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा आघाडीचा उमेदवार कोण असणार हे शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे.

शरद पवार हे शुक्रवारी सकाळी साताऱ्यात येणार असून काही तासासाठीच  ते साताऱ्यात थांबणार आहे. यावेळी त्यांच्याकडून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असावा?, कोणाचा विरोध आहे का? याचीही चाचपणी करणार हे नक्की. त्यामुळे शुक्रवारच्या पवारांच्या या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील इंडिया आघाडी नेत्यांच्या बैठकीस राहणार उपस्थित…

दरम्यान, शुक्रवारी सकाळी शरद पवार हे मुंबईवरून हेलिकॉप्टरने साताऱ्यात येणार आहेत. त्यानंतर ११ ते १ या वेळेत राष्ट्रवादीची बैठक सातारा शहराजवळ कोडोली येथील साई सम्राट हॉलमध्ये होणार आहे. या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवाराबद्दल चर्चा करणार आहेत. तर दुपारी अडीच वाजता  इंडिया आघाडी नेत्यांबरोबर बैठक होईल. या बैठकीस पवार उपस्थित राहणार आहेत.