खा. शरद पवारांच्या हस्ते आज होणार कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | रयत शिक्षण संस्थेची गावामधील संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे भूषविणार आहेत.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आक्टोबर १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच संस्थेचे पहिले वसतिगृहही काले येथेच सुरू केले. तर १ ऑगस्ट १९४८ रोजी महात्मा गांधी विद्यालयाची स्थापना करण्यात आली. 2023 मध्ये या शाळेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

काले येथील शाळेच्या नूतन इमारतीसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सुमारे १ कोटी रुपयांचा निधी शरद पवार यांनी दिला आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेकडून ५५ लाख, सदुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड यांच्याकडून २० लाख, रयत शिक्षण संस्थेचे व महात्मा गांधी विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, रयत सेवक, शिक्षक, हितचिंतक व शालेय बाल गोपाळांनी दिलेले आपल्या वाढदिवसाचे व खाऊचे पैसे असे मिळून सुमारे ७२ लाखाचा निधी शाळेच्या इमारतीसाठी दिला. वा सर्व निधीतून सुमारे २ कोटी रुपयांहून अधिक रकमेची भव्य-दिव्य अशी शाळेची इमारत उभारण्यात आली असून त्या शाळा माऊलीचा उद्घाटन समारंभ पार पडत आहे.

महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली होती. सध्या शाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून अत्यंत देखणी इमारत उभी राहिली आहे. या नूतन इमारतीचे रविवारी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीचे औचित्य साधून त्याच दिवशी विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता सस्थच अध्यक्ष शरदचंद्र पवार याच्या हस्त उद्घाटन सोहळा संपन्न हात आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी आहेत. तसेच संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, माजी खा. श्रीनिवास पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, संस्थेचे व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य खा. रामशेठ ठाकूर, संस्थेचे सचिव विकास देशमुख, विभागीय चेअरमन संजीव पाटील यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे सर्व आजी- माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र नांगरे- पाटील पाटील व स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.