शरद पवार घेणार 11 दिवसांत 42 सभा; जिल्ह्यात ‘या’ 5 ठिकाणी धडाडणार तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांसाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. अवघ्या ११ दिवसांत त्यांच्या ४२ सभा घेणार आहेत. दररोज चार सभांचे नियोजन देखील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील हातातून गेलेला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या पाच ठिकाणी सभांतून तोफ धाडाडणार आहे.

राज्यात २८८ विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी व महायुतीकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. दोन्ही आघाड्यांकडून खसडकरून पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून देखील प्रचार सभा घेतल्या जाणार असून मविआच्या संयुक्त प्रचार दौऱ्यातही शरद पवार सहभागी होणार आहेत. पवार यांच्या सर्वाधिक सभा या पश्चिम महाराष्ट्रात होणार असल्याने अजित पवार व त्यांच्या गटातील आमदारांची चिंता वाढणार आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ८७ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ उमेदवार उभे केले आहेत. उत्तर महाराष्ट्र १८, मराठवाडा १५, विदर्भ १२ आणि मुंबई कोकण विभागात ११ उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वतः राज्यभर दौरे करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यावरही प्रचाराची धुरा देण्यात आली आहे. इतर ४० स्टार प्रचारक देखील प्रचारात उतरणार आहेत.

अशा होणार सभा

दि. ८ नोव्हेंबर रोजी : हिंगणघाट जिंतूर, बसमत

दि. ९ नोव्हेंबर रोजी : उदगीर, परळी वैजनाथ, आष्टी, बीड

दि. १० नोव्हेंबर रोजी : भूम-परांडा, शेवगाव-पाथर्डी, गंगापूर, घनसावंगी

दि. ११ नोव्हेंबर रोजी : एरंडोल, सिंदखेड, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण

दि. १२ नोव्हेंबर रोजी : कळवण, दिंडोरी, सिन्नर, येवला, कोपरगाव

दि. १३ नोव्हेंबर रोजी : श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, भोसरी

दि. १४ नोव्हेंबर रोजी : शिरूर, खडकवासला, चिंचवड

दि. १५ नोव्हेंबर रोजी : तासगाव, चंदगड, कराड उत्तर

दि. १६ नोव्हेंबर रोजी : वाई, कोरेगाव, माण, फलटण

दि. १७ नोव्हेंबर रोजी : करमाळा, माढा, कर्जत-जामखेड

दि. १८ नोव्हेंबर रोजी : भोर, दौंड, इंदापूर, बारामती