महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता निकालाचे अंदाज आणि आकडेमोड सुरू झाली आहे. अशातच खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल, असं म्हटल आहे. आम्हा सर्वांना मिळून ३० ते ३५ जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

लोकांना बदल हवा आहे

मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे सहा उमेदवार निवडून आले होते. यावेळी लोकांना बदल पाहिजे आहे. निवडणुकीत तसा ट्रेंड दिसून आला असून आम्हाला सर्वांना (महाविकास आघाडी) मिळून ३० ते ३५ जागा मिळतील, असा अंदाज राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी वर्तवला.

राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांचा पाठिंबा

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शरद पवार गुरूवारी साताऱ्यात आले होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विचारांबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लोक समर्थन देत आहेत. आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत असल्याने यावेळी आमची संख्या ३० ते ३५ खासदारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

मोदींचा आत्मविश्वास कुठं गेलाय ते समजतंय

शिवाजी पार्कवर होणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्बात शरद पवार म्हणाले की, सभेत काय होतंय ते बघुया. मोदींना कोणा- कोणाची मदत हवी आहे, हे यातून दिसते. त्यांचा आत्मविश्वास कुठं गेलाय, हेही समजतंय, अशा खोचक टोलाही पवारांनी लगावला.

अजितदादांना दिला उपरोधिक सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार स्वतःच सर्व निर्णय घेतात, पण पक्षाने निर्णय घेतल्याचे दाखवतात, या अजित पवारांच्या टीकेवर शरद पवारांनी अजितदादांना उपरोधिक सल्ला दिला. त्यांनी त्यांचा पक्ष नीट चालवावा. दुसऱ्याच्या पक्षात तोंड घालू नये, असं शरद पवार म्हणाले.