सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा संस्थापक शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेला भेट दिली. यावेळी कार्यक्रमानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी अजित पवार यांना लाडकी भिन योजनेवरील तोलेही लगावला. “राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाकडी बहीण योजनेचं स्वागत आहे. कुठल्या का होईना बहिणींना द्यावा”, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच ”माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही. पण, जयंत पाटील यांना ते लोकं भेटतात याची माहिती मला आहे. त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचं मतदान झाल्यावर कळेल,” असा गौप्यस्फोट देखील शरद पवार यांनी केला.
सातारा येथील पत्रकार परिषदेतून शरद पवार यांनी एकाचवेळी अनेक विषयावर महत्वाची विधाने केली. यावेळी पवार म्हणाले की, राज्य सरकारने योजना जाहीर केल्या, पण माझा अनुभव आहे की अंदाजपत्रक मांडल्यानंतर 6 महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. पण, इथं केवळ 8 दिवसात पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसतं. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे, पण संपूर्ण राज्यात ही योजना पार पाडता येईल का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.
मोदींचा देश चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जनतेनं हाणून पाडला
लोकसभा निवडणुकीतील निकाल म्हणजे नरेंद्र मोदी यांचा देश चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जनतेनं हाणून पाडला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने जनता निर्णय घेईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा
आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी या चिन्हामुळे फटका बसला, विशेष म्हणजे सातारा लोकसभा मतदार संघात देखील आम्हाला या निवडणूक चिन्हांच्या साधर्मतेचा फटका बसला आहे. सध्या आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे, आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना देण्यात आलं. हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे, अशी माहितीही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली. तसेच पक्षासाठी स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, असेही पवार यांनी यावेळी म्हटले.