कराड प्रतिनिधी । कराड पालिकेला मुख्याधिकारी काही टिकेना अशी गेल्या काही महिन्यापासून परिस्थिती पहायला मिळत आहे. एखादा अधिकारी आला कि तो वर्ष, दोन वर्षात पुन्हा बदली होऊन जातो किव्हा त्याच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. सध्या कराडचा कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर शहरातील अनेक प्रश्न, समस्यांचा भर आहे. प्रशासनाच्या हाती कारभार असला तरी तो चालवणारा असावा लागतो. तो चालवण्यासाठी आता बदलून गेलेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे. लवकरच ते मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
कराड पालिकेत पाच महिन्यापूर्वी जून महिन्यात कराड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर खंदारे यांची नियुक्ती झाली होती. काही दिवस येथील काम पाहिल्यानंतर त्यांचे महिनाभरातच अतिरिक्त आयुक्त अकोला महानगरपालिकेत पदस्थापना देण्यात आल्याचे आदेश शासनाच्यावतीने काढण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा खंदारे यांची कराड पालिकेत मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता ते पुन्हा कराडचे कारभारी झाले आहेत.
वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहिलेल्या शंकर खंदारे यांची नेमणूक कराड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आल्यानंतर त्यांनी येथील काम काही दिवस पाहिले. दि. १० जूनला कराड पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर खंदारे रुजू झाले होते. तर त्यांच्याअगोदर मुख्याधिकारी म्ह्णून असलेल्या रमाकांत डाके यांची कराडहून नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे बदली झाली. एक महिना त्यांनी कराड पालिकेचा कारभार पाहिला. मात्र, आता त्यांच्या जागी पुन्हा एकदा खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे