“उबाठा येऊ दे नाहीतर पवार राष्ट्रवादी येऊ दे मी…”; पालकमंत्री देसाईंचा पाटणकर गटासह हर्षद कदमांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पाटण तालुका विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन, उद्धटन होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर आणि उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांना इशारा दिला. “मी मागे एकदा सांगितलं होतं 2014 ला की सिंह येऊ दे नाहीतर हवा येऊ दे शिकार करायला बंदूक ठासून मी तयार आहे. त्यामुळे आता सुद्धा उभाटा येऊ दे नाहीतर पवार राष्ट्रवादी येऊ दे नाहीतर आणि कोणी येऊ दे सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचाच भगवा फडकणार, असा इशारा मंत्री देसाई यांनी दिला.

पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाटण तालुकयातील विधानसभा निवडणूकीबाबत व धर्मवीर २ बाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री देसाई म्हणाले कि, आपल्याला माझी जी जनता माझ्या मतदारसंघातली आहे, असा माझे जे कार्यकर्ते या मतदारसंघातले आहेत महायुतीचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आमचे आहेत ते सगळे वाट बघतायत निवडणुकीची त्यामुळं या 261 पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचाच भगवा फडकलेला आपल्याला पाहायला मिळेल.

यावेलीव मंत्री देसाई यांनी विधिमंडळातील सहकारी संजय शिरसाठ यांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दिवंगत आनंद दिघे यांचे निधन झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात शंका होती. काही तासानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र काही तासात अचानक त्यांचा मृत्यू झाला. आमचे विधिमंडळातील सहकारी संजय शिरसाठ यांनी जी शंका उपस्थित केली आहे ते पाहता यात शंका घ्यायला वाव आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही जोरदार टीका

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी उद्धव ठाकरे प्रेशरखाली असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता त्यांचीच लोक म्हणायला लागली असून, यावर आम्ही काय बोलणार ? आमदार भास्करराव जाधव यांना अनुभव आला असावा. महायुतीत असताना उद्धव ठाकरे यांचे प्रेशर सहकारी पक्षांवर होते. महायुती सोडून चुकीच्या लोकांची संगत धरल्याने उद्धव ठाकरे यांना आता कोणाच्या तरी प्रेशरखाली राहावे लागत आहे. दुसऱ्याला प्रेशर देणारे नेतृत्व शिवसेनेचे असते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी स्वतःकडे नेतृत्व ठेवले आणि त्यांना जे हवे होते ते त्यांनी महायुतीत करून घेतले होते. पण आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे कोणाच्यातरी प्रेशर खाली राहतात आणि कोणाच्यातरी प्रेशर खाली वागतात हे त्यांचे सहकारी बोलत आहेत. त्यामुळे याचा विचार आता त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या शिवसैनिकांनी करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या सभेला लोक जमत नाहीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय व्यक्तिमत्व पाहिल्यास आणि त्यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास एक स्पष्ट वक्ता नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नेहमीच त्यांच्या सभांना गर्दी होते आणि आजही त्यांच्या सभांना गर्दी होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पैसे वाटून लोकांना सभेला आणण्याची वेळ कधीही येणार नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि केवळ अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे असे मंत्री देसाई यांनी म्हटले.