शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील आरे गाव येथे शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानासाठी जागेचा प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. या संदर्भात त्यांच्या मातोश्री कालिंदी महाडिक व चुलत बंधू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. आरे गाव येथे शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या स्मृती उद्यानासाठी 37 गुंठे जमिन देण्यात येणार आहे. या ठिकाणी महसूल विभागाने त्वरीत भेट देवून जमिन मोजणी करुन द्यावी व सरकारी आदेश काढावा, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री स्वत: इतके वर्ष या विषयी पाठपुरावा करित आहेत. यंत्रणेने हा विषयक प्रधान्याने व संवेदशिनलपणे मार्गी लावावा, असे निर्देशही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

यावेळी त्यांनी श्रीमती कालिंदी महाडिक यांना अत्यंत आदराने बोलवून घेत त्यांचा विषयक ऐकूण घेतला आणि महसूल विभागाला तात्काळ स्थळ पहाणीच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर येणाऱ्या 15 ऑगस्ट पासून वॉर मेमोरियलला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे या दिवशी अभिवादन करण्याची प्रथा जिल्ह्यात सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.