भूस्ख्लन, पुरातील बाधित 9 गावातील 614 कुटुंबांचे पुनर्वसन होणार; पालकमंत्री देसाईंच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बाइतकं घेतली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भूस्ख्लन, पुरामुळे बाधित झालेल्या 9 गावातील 614 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांच्या घरांच्या कामाचा शुभारंभ सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात येणार असून त्याबाबत योग्य माहिती घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनास दिल्या.

सातारा येथे आज पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, वन विभागाच्या हद्दी जवळील शेतमालांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी सौर कुंपणाच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता देण्यात येईल. जिल्हा परिषदेमधील जुन्या लोकल बोर्डाची इमारतीची डागडुजी करून पूर्वी जशी इमारत होती तशीच जुन्या इमारतीचे सौंदर्य व्यवस्थित जतन करण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष ते शेवटचे अध्यक्ष यांचे छायाचित्रे व कार्यकाल, इतिहास या इमारतीमध्ये लावावे, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.