गजापुरातील दगडफेक, जाळपोळीच्या घटनेप्रकरणी देसाईंनी दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | विशाळगडाच्या परिसरात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. अतिक्रमण विशाळगडावर होते आणि दगडफेक, जाळपोळ, मोडतोड तेथून चार किलोमीटर अलीकडे झाली. त्यामुळे अधिक सतर्कता घेतली असती, तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता. तेथील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तेथील सर्व प्रकरणाची माहिती घेऊन दोषींना शोधून काढून कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

पालकमंत्री देसाई यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्रायकिंग रेट ४७ आहे. आम्ही मायक्रोप्लॅनिंग केल्याने लोकसभेला चांगले यश मिळाले आहे. आम्ही विधानसभेच्या कामाला लागलो आहोत. जागा किती लढवायच्या हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मित्र पक्षाचे नेते ठरवतील. लवकरच त्यासंदर्भात बैठक होणार आहे.

यावेळी पालकमंत्री देसाई यांनी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील हे काय बोलले आहेत ते मी ऐकलेले नाही. मात्र, आवश्यकता असल्यास मी त्यांची भेट घेईन, असे देसाई यांनी म्हटले.