सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर उद्या मंगळवारी महायुतीचा शपथविधी होणार असून या नव्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे 5 , राष्ट्रवादीचे ही पाच मंत्री आणि भाजपचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि पाटण तालुक्यातील शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार उद्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यामध्ये महायुतीचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणारा आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात असे एकूण 20 मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि पाटण तालुक्यातील शंभुराज देसाई, राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस अजूनही कायम आहे.
राज्यात महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमताच्या जोरावर उद्या नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. आज रात्री महायुतीतील तिन्ही पक्षाचे मोठे नेते दिल्लीत येणार असून उद्या शपथविधीवर यामध्ये महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत ही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.