एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; पाटणमधून देसाई तर कोरेगावातून महेश शिंदेंना संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ज्या पक्षाच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं त्या पक्षाने आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत शिंदेंनी 45 उमेदवारांना तिकीट दिलं आहे. सातारा जिल्ह्यात पाटण मतदार संघातून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) तर कोरेगाव मतदार संघातून महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीला आता महिन्याभरापेक्षा पण कमी कालावधी उरला असून राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम रविवारी दुपारी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर महायुतीमधील दुसरा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवार यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या. दोन्ही पक्षांनी आपल्या पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पहिल्या यादीकडे सगळ्यांचच लक्ष होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक असून आता शिवसेनेने आता 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अर्जुन खोतकर, दादा भुसे, भरत गोगावले या बड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे माहिमध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी

  1. एकनाथ शिंदे – कोपची पाचपाखाडी
  2. पाटण – शंभूराज देसाई
  3. चोपडा – चंद्रकांत सोनवणे
  4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
  5. पाचोरा – किशोर पाटील
  6. एरंडोल – अमोल पाटील
  7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
  8. बुलढाणा – संजय गायकवाड
  9. मेहकर – संजय रायमुलकर
  10. दर्यापूर – अभिजीत अडसूळ
  11. आशिष जयस्वाल – रामटेक
  12. भंडारा – नरेंद्र भोंडेकर
  13. दिग्रस – संजय राठोड
  14. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
  15. कळमनुरी – संतोष बांगर
  16. जालना – अर्जुन खोतकर
  17. सिल्लोड – अब्दुल सत्तार
  18. छ संभाजीनगर मध्य – प्रदीप जयस्वाल
  19. छ. संभाजीनगर पश्चिम – संजय सिरसाट
  20. पैठण – रमेश भूमरे
  21. वैजापूर – रमेश बोरनारे
  22. .नांदगाव – सुहास कांदे
  23. मालेगाव बाह्य – दादाजी भूसे
  24. ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
  25. मागाठाणे – प्रकाश सुर्वे
  26. जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
  27. चांदिवली – दिलीप लांडे
  28. कुर्ला – मंगेश कुडाळकर
  29. माहीम – सदा सरवणकर
  30. भायखळा – यामिनी जाधव
  31. कर्जत महेंद्र थोरवे
  32. अलिबाग – महेंद्र दळवी
  33. महाड – भरत गोगावले
  34. उमरगा – ज्ञानराज चौगुले
  35. सांगोला – शहाजीबापू पाटील
  36. कोरेगाव – महेश शिंदे
  37. परांडा – तानाजी सावंत
  38. साक्री – मंजुळा गावीत
  39. दापोली – योगेश कदम
  40. रत्नागिरी – उदय सामंत
  41. राजापूर – किरण सामंत
  42. सावंतवाडी – दीपक केसरकर
  43. राधानगरी – प्रकाश आबिटकर
  44. करवीर – चंद्रदीप नरके
  45. खानापूर – सुहास बाबर