पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय असते हे पवारांना आता चांगलेच कळले असेल : शालिनीताई पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजप-शिंदे सरकारसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या असून यावरून कोरेगावच्या माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. देशात विश्वासघातकी राजकारणाला शरद पवार यांनीच सुरुवात केली आहे. स्व. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचे चांगले चाललेले सरकार पाडणाऱ्या पवारांना आज पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय असते. हे चांगले कळाले असेल, अशी घणाघाती टीका माजी मंत्री पाटील यांनी केली.

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, विरोधकांच्या चौकशांमधून सुटता यावे म्हणून काका शरद पवार यांचा पुतण्या अजित पवार यांनी काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आज पवारांना देखील चांगलेच समजले असेल कि पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय असते? हे चांगले कळाले असेल. शरद पवार यांचा आदर्शच त्यांचा पुतण्या अजित पवार याने घेतला आहे.

50 वर्षांपूर्वी वसंतदादांना जो काही त्रास झाला असेल तो स्वतःला कसा होतो, हे शरद पवार यांना पाहायला मिळाला आहे. हा सर्व नियतीचा नियम असून, जे पाप करायचे, ते येथेच फेडायचे, शरद पवार यांना या वयात पाप फेडावे लागले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडाळीला शरद पवार हेच जबाबदार आहेत, असा टोला यावेळी डॉ. पाटील यांनी लगावला.