सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार पवारांनी बंड केले. दुसरी राष्ट्रवादी तयार करत आमदारांना सोबत घेत भाजप आणि शिंदे गटाचा हात हातात घेतला. आता अजितदादांनी केलेल्या बंडाचा आणि पूर्वी काका खा. शरद पवार यांनी केलेल्या त्याकाळच्या बंडाची चर्चा सध्या केली जात आहे. मात्र, दोघांच्यातील बंडात नेमका काय फरक होता? हे शालिनीताई पाटील यांनी सांगित पुतण्या अजितदादांना चांगलाच सुनावलं आहे.
शालिनीताई पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री अजितदादा पीआर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी शालिनीताई पाटील म्हणाल्या की, अजित पवार आणि शरद पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी होते. २०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलत्याचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात केला त्याच्यावर विश्वास का ठेवावा?,
अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही.अजितदादांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले. त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. त्यानंतर जी दुर्दशा होईल. तुरुंगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते. त्याला निवडणूक लढवता येत नाही. तसे होईल. १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस असल्याचे देखील यावेळी शालिनीताई पाटील यांनी सांगितले.
आम्ही समोरासमोर निवडणूक लढवली, कारस्थान केले नाही
मी सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण यांच्याविरोधात निवडणुकीला उभी राहिलेली आहे. त्यावेळी ते उपपंतप्रधान होते. त्यांच्यासमोर उभे राहायला कुणी तयार नव्हते. आम्ही काँग्रेसमध्ये होतो आणि ते काँग्रेससोडून बाहेरून लढत होते. त्यांच्या विरोधात उभे राहण्याचा माझ्या पक्षाने आदेश दिला. सातारा जिल्ह्यात त्यांच्या विरोधात कुणी अर्ज केला नाही. वसंतदादांना पक्षाने उभे राहण्यास सांगितले. परंतु मी सांगलीतून उभा राहतोय. तुम्ही शालिनीताई ज्यांचे माहेर सातारा आहे. माहेरची लोक त्यांना प्रेम करतात. पक्षाने शालिनीताईंना उमेदवारी द्यावी अशी शिफारस त्यांनी केली. त्यानंतर पक्षाने मला उमेदवारी दिली. आम्ही समोरासमोर निवडणूक लढवली. कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नसल्याचे देखील शालिनीताईंनी यावेळी सांगितले.