साताऱ्यात शाही दसरा सोहळ्यास सुरुवात; भवानी तलवारीला मानवंदना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । भाजप खा. छ. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास नुकतीच काही सुरुवात देखील झाली आहे. शिवपराक्रमावर पोवाडे, मर्दानी खेळ तसेच ऐतिहासिक उपक्रमांचा सोहळ्यात सहभाग असून प्रशासनही सहभागी झाले आहे.

satara 1

दरम्यान, आज शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जलमंदिर पॅलेस येथे युद्धकला प्रत्यक्षिके सादर करण्यात आले. दुपारी ४ वाजता पोलिस वाद्यवृंद, मानवंदना पथक, पोवाडा समूह, मर्दानी खेळ पथकांचे खा. श्री. उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेस येथे आगमन झाले. सायंकाळी ५ वाजता जलमंदिर येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने भवानी तलवारीला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मिरवणूकीस जलमंदिरपासून प्रारंभ करण्यात आहे.

राजवाडा, मोती चौक, राजपथमार्गे शिवतीर्थाकडे प्रस्थान करणार आहे. या मिरवणुकीत विविध वाद्यांसह घोडे, ऐतिहासिक वेशभूषा केलेले मावळे सहभागी झाले असून, हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. या मिरवणुकीत खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले व प्रशासनाचे अधिकारी तसेच नागरिक सहभागी झाले आहेत. सायंकाळी ६.३० वाजता पालखीसोबत लोकप्रतिनिधी तसेच निमंत्रितांचे शिवतीर्थकडे मार्गस्थ झाले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन हे देखील उपस्थित आहेत. शिवतीर्थ येथे भवानी तलवारीचे आगमन झाल्यावर येथे भवानी तलवारीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर भवानी तलवारीचे जलमंदिरकडे प्रस्थान होणार आहे. जलमंदिर येथे राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि परिवाराचा नागरिकांसोबत सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे.