कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अमरण उपोषण दि. १ नोव्हेंबर रोजी केले होते. दोन महिण्याच्या आत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, आता चार महिने झाले तरी प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शामगावसह परिसरातील पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील शामगाव हे गाव कायमचे दुष्काळी म्हणून ओळखले जाते. येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाण्याची कायम कमतरता भासते. या ठिकाणी पिकांना मुबलक पाणी मिळावे अशी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असते. शेतीच्या पाण्यासाठी गेले अनेक वर्षे ग्रामस्थ, शेतकरी धडपड करत आहेत परंतु त्यांना यश आले नाही.
१ नोहेंबर २०२३ ला शेतीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण केले अधिकारी आणि राजकीय नेते आले आणि दोन महिण्यात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन लिंबू सरबत उपोषण कर्त्यांना उपोषणाची सांगता करण्यात आली. चार महिणे झाले प्रशासकीय काम सुरू आहे. पाणी प्रस्तावाची वारी ओगलेवाडी, पुणे, मुंबई,अशी त्रुटी काढण्याची अधिकाऱ्यांची सुरू आहे. सध्या लोकसभेची निवडणूक संपली असल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आता तरी आम्हाला पाणी द्या,अशी मागणी ग्रामस्थानकडून केली जात आहे.
अजून किती दिवस भीषण पाणी टंचाईला सोयरे जायचे?
आमच्या शामगांवसह परिसरातील गावातील ग्रामस्थांना शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या कायम जाणवत असते. गावातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून उपोषण देखील केले होते. त्यावेळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे प्रश्नाकडून उत्तर मिळाले. निवडणुकीच्या काळात प्रशासन निवडणुकीच्या कामात होते. आता अनिवडणुकीचे काम झाले असून देखील आमच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यायला प्रशासनाकडे वेळ नसल्याचे दिसते. अजून किती दिवस आम्हाला भीषण पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया शामगाव येथील शेतकरी कुमार गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.