कराड प्रतिनिधी । कराड येथील ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर यांना यशवंत नगरी फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र व ११ हजार १११ रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर यांनी पत्रकारितेत ४० वर्षे होऊन अधिक काळ अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले आहे.
हा पुरस्कार सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ,राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग बाबा पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, श्रीनिवास पाटील फाउंडेशन च्या उपाध्यक्ष सौ. रचनाताई पाटील यशवंत नगरी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भोसले उपाध्यक्ष सौ.स्वाती भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा इतिहास असून या इतिहासातील सुवर्णपान म्हणून उदय किरपेकर यांचा उल्लेख करावाच लागेल. उदय किरपेकर यांचे कराडच्या पत्रकारितेत खूप मोठे कार्य असून गेली ४० वर्षे ते करीत असलेल्या फळ म्हणून यशवंतराव चव्हाण पुरस्कार देताना मनस्वी आनंद होत आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम राष्ट्रवादी आयटीसी चे प्रदेशाध्यक्ष सारंग बाबा पाटील भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करीत उदय किरपेकर यांच्या पत्रकारितेचा गौरव केला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्वा भोसले यांनी केले तर आभार राहुल ताटे यांनी मांनले.