सातारा प्रतिनिधी । केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरे सुरु केले आहेत. त्या-त्या मतदार संघाचा आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा भाजपा पदाधिकारी, सरचिटणीस यांची संघटनात्मक बैठक भाजपा मुख्यालय मुंबई येथे नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांच्यासह जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाबाबत आढावा सादर केला.
यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ, राष्ट्रीय संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार उदयनराजे भोसले, राज्य संघटन मंत्री मकरंद देशपांडे, विधान परिषद सदस्या आ. पंकजाताई मुंडे, विधान परिषद सदस्य आमदार श्रीकांत भारतीय, आमदार जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, अजय जमवाल, रघुनाथ कुलकर्णी, सागर शिवदास यांची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये दौरे सुरु केले आहेत. या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांकडून सातारा जिल्ह्यसह इतर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, सातारा जिल्हा भाजपा पदाधिकारी, सरचिटणीस यांची संघटनात्मक बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सूत्रे हलवणार आहेत. मुंबईतील बैठकीत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमा यांच्यासह जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी आठही विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा सादर केला.