साताऱ्यातील ‘या’ महाविद्यालयात होणार 12 जानेवारीला ‘अनोखा’ परिसंवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागमार्फत परिसंवाद आणि मराठवाडा इतिहास परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजितकरण्यात आले आहे. दि. 12 व 13 जानेवारी 2024 रोजी बॅरिस्टर पी. जी. पाटील सभागृहात होणाऱ्या या अधिवेशनात परिसंवादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडातील इतिहासावर शोधनिबंधांचे वाचन केले जाणार आहे. शुक्रवार, दि.12 जानेवारी रोजी दुपारी 12.30 राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त परिसंवादाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी परिसंवाद कार्यक्रमास पत्रकार शिवाजी राऊत, विजय मांडके व डॉ. भारतभूषण माळी सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकीहाळ अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या वतीने देण्यात आली आहे.