लायन्स क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी जितेंद्र ओसवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । लायन्स क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी जितेंद्र ओसवाल तर सचिवपदी अविनाश भिसे आणि खजिनदारपदी सुप्रीम तावरे यांची निवड करण्यात आली आहे. 58 वर्षाची परंपरा असलेला कराड लायन्स हा सर्वात जुना क्लब आहे.

लायन्स क्लब कराडचा कायमस्वरूपी प्रकल्प असलेल्या आर. के. लाहोटी लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून पन्नास हजाराहून अधिक रुग्णावर मोफत डोळे शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.

जितेंद्र ओसवाल आणि त्यांच्या संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ नुकताच लायन्स इंटरनॅशनलचे द्वितीय उपप्रांतपाल राजेंद्र कसवा आणि माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, रिजन चेअरमन दिलीप वहाळकर ,झोन चेअरमन रमेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आ. बाळासाहेब पाटील, उदयसिंह पाटील उंडाळकर, जैन समाजाचे अध्यक्ष कांतीलाल जैन तसेच कराड शहरातील मान्यवरांनी जितेंद्र ओसवाल यांचे अभिनंदन केले आहे.

विविध सामाजिक उपक्रम राबवणार : जितेंद्र ओसवाल

लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. या पुढील वर्षभरात क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र ओसवाल यांनी यावेळी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.