सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांकडून कलम 36 लागू;नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दि. 6 जून 2024 रोजी शिवराज्यभिषेक दिन व दि. 17 जून 2024 रोजी बकरी ईद हे सण साजरे होणार आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यात मिरवणूकांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे, मिरवणुकीतील तसेच कार्यक्रमातील व्यक्तींचे वर्तन कसे असावे तसेच ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन होऊन लाऊड स्पिकरचा वापर योग्य प्रकारे व्हावा याकरिता निर्बंध घालण्याकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकार दि. 19 जून पर्यंत कालावधीकरिता पोलीस अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांना प्रदान केले आहेत. या विषयीचे आदेश पोलिस अधिक्षक शेख यांनी निर्गमित केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बकरी ईद सणाच्या अनुषंगाने उघड्या वाहनातून मांसाची विक्री करु नये, सार्वजनिक ठिकाणी जनावरांची कत्तल करु नये, तसेच उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रार्थना स्थळाचे आजुबाजुस हाडे/मांस टाकु नये, या विषयी निर्देश देणे. रस्त्यावरील किवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वागणूक किंवा वर्तणूक कशी ठेवावी, या विषयी निर्देश देणे,

अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल. अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किवा घाटावर सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ने आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजविणे यांचे विनिमयन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे,

कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकर) उपयोग करणेचे विनियमन करणे, व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य ते आदेश देणे यांचा यामध्ये समावेश आहे.