सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दि. 19 रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्यावेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहे. त्याचे पालन व्हावे या करिता जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे दि.19 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत च्या कालावधीसाठी कलम 36 लागू केले आहे.
या अधिकारानुसार त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मिरवणुकीच्या मार्गासंबंधाने मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे आसावे, ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
दरवर्षी सातारा जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मोठ्या प्रमाणात मिरवणूका या श्रीभागात काढल्या जातात. तसेच ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केले जाते.