कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनातर्फे केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण उत्साहात

0
28
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनातर्फे यांत्रिकीकिरण प्रक्रियेतून इतर विधानसभा मतदारसंघातून मतदार संघातील निवडणूक कर्तव्यावर आलेल्या सर्व केंद्राध्यक्ष व सर्व मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शनिवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सैदापूर येथे पार पडले. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात झालेल्या प्रशिक्षणास प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळ सत्रात प्रत्यक्ष मतदान यंत्रे हाताळणीचे प्रशिक्षण घेतले. सर्व उपस्थित केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सचित्र संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.

यावेळी प्रशिक्षणासाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉक्टर जस्मिन शेख, क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतदानाच्या आदल्या दिवशी साहित्य घेताना तपासून घ्यावयाच्या बाबी, मतदान केंद्राची रचना, मतदान यंत्राचे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट युनिट जोडण्याची प्रक्रिया, अभिरूप मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र मोहर बंद करण्याची प्रक्रिया, प्रतिनिधींच्याकडून विविध घोषणापत्रे स्वाक्षरी करून घेण्याची प्रक्रिया, मतदान यंत्रे बदलण्याची आवश्यकता भासल्यास पूर्ण करण्याची प्रक्रिया, मतदान यंत्रातून दर्शविल्या जाणाऱ्या विविध सूचनांचा अर्थ, मतदान अधिकाऱ्यांना नेमून द्यावयाची कर्तव्ये, मतदान केंद्रात प्रवेश करण्यास पात्र व्यक्ती, मतदाराची ओळख पटवण्यासाठी आवश्यक पुराव्यांची यादी, मतदान प्रतिनिधी नेमणुकीच्या अटी व त्यांच्यासाठी असलेले नियम,अंध, दिव्यांग, वृद्ध, दुबार, प्रॉक्सी मतदार, विविध लिफाफे भरण्याची व मोहरबंद करण्याची प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.

17 ए मतदार नोंदपुस्तिका व 17 सी नोंदविलेल्या मतांचा हिशोब,मतदान केंद्राध्यक्षाची डायरी,भेट पुस्तिकेतील नोंदी,मतदान प्रक्रिया बंद करताना करावयाची प्रक्रिया,घोषणापत्रे,इत्यादीबाबत सविस्तर प्रशिक्षण कराड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना दिले. प्रशिक्षण पूर्ततेनंतर प्रशिक्षणार्थींची लेखी परीक्षा घेण्यात आली.