मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत महाबळेश्र्वर गिरीस्थान प्रशालेने पटकावला दुसरा क्रमांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्र्वर गिरीस्थान प्रशालेने दुसरा क्रमांक पटकवला. या अभियानाचा दुसरा टप्पा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे.

महाबळेश्वर गिरीस्थान प्रशालेत पायाभूत सुविधा मध्ये शालेय फर्निचर,पर्यावरण पूरक शाळा, सर्व वर्ग खोल्या सुबक रंगरंगोटी करून बोलक्या भिंती कऱण्यात आल्या. संपूर्ण प्रशालेच्या चेहरा मोहरा बदलण्यात आला असून शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत.

परसबाग विकास, आधार वैद्यता, महावाचन चळवळ,विविध विद्यार्थी समित्या,स्वच्छ्ता मॉनिटर,विद्यार्थी उपस्थिती, ऐतिहासिक वस्तू जतन, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य अशा विविध उपक्रमात प्रशालेने उत्तम कामगिरी केली. भौतिक सुविधा सुधारणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले व सर्व सोयी सुविधा प्रशालेस मिळवून दिल्या. यासाठी प्रशालेचे प्राचार्य ढाणक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल नगरपालिकेचे व गिरीस्थान प्रशालेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.