सातारा लोकसभेसाठी दाखल केलेल्या दिग्गजांच्या अर्जांची आज छाननी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक 2024 साठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पार पडला. शेवटच्या दिवशी १६, तर शेवट्या दिवसा अखेर एकूण २४ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले. लोकसभा निवडणुकीत दिग्गजांसह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जांची आज दि. २० रोजी छाननी केली जाणार आहे. या छाननीत कुणाकुणाचे अर्ज बाद होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा येथील जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात शुक्रवारी शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले भाजप, वैशाली शशिकांत शिंदे (शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस ), आनंदा रमेश थोरवडे, कऱ्हाड यांनी बहुजन समाज पार्टी, तुषार मोतलिंग, कळंबे यांनी बहुजन मुक्ती पार्टी, प्रशांत रघुनाथ कदम, रा. वडगाव (उंब्रज), ता. कराड (वंचित बहुजन आघाडी) यांनी उमेदवारी अर्ज भरले तर अपक्ष म्हणून सीमा पोतदार पुसेसावळी, प्रतिभा सुनील शेलार, सातारा, विठ्ठल सखाराम कदम, (रा. जोर, पो. वयगाव, ता. वाई), विश्वजित अशोक पाटील, (रा. उंडाळे, ता. कराड), मारुती धोंडीराम जानकर, सातारा, अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले सातारा, सचिन सुभाष महाजन, (रा. बुध, ता. खटाव), सदाशिव साहेबराव बागल, (रा. गोवे, ता. सातारा), गणेश शिवाजी घाडगे, (रा. शिबेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.

तसेच यापूर्वीही शशिकांत शिंदे, ( शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ), उदयनराजे भोसले भाजप, दिलीप बर्गे भारतीय जवान किसान पार्टी, दादासाहेब वसंतराव ओव्हाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सयाजी वाघमारे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पक्ष, आनंदा रमेश थोरवडे बहुजन समाज पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष म्हणून राहुल चव्हाण, सागर भिसे, निवृत्ती शिंदे, चंद्रकांत कांबळे, संजय गाडे, सुरेशराव कोरडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. छाननी व अर्ज माघारीनंतर लढतीचे लढतीचे चित्र स्पष्ट होईल.