सातारा प्रतिनिधी | राज्यात निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या काळात शाळा भरवू शकत नाहीत अशा शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे. शासनाने राज्यातील शाळांना दि. 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत शिक्षकांतून जात आहे. कारण १८ तारखेपासून २० तारखे ऐवजी १९ ते २१ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात अशी मागणी शिक्षकांतून होत आहे. २० रोजी मतदान झाल्यानंतर रात्री उशिरा मतदान पेट्या जमा करून सकाळी लवकर शिक्षकांना पुन्हा शाळेत हजर व्हावे लागणार आहे. त्यामुळे २१ रोजी सुट्टी देण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील शिक्षकांतून केली जात आहे.
दि. २० नोव्हेंबरला मतदान असल्याने राज्य सरकारने या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे बऱ्याच पालकांना शनिवार, रविवार सुट्टी असून सोमवार आणि मंगळवारच फक्त कामाचे दिवस आहेत. यामुळे हे पालक दोन दिवस सुट्टी टाकून मोठी सुट्टी देखील घेण्याची शक्यता आहे. यामुळे मतदानावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे.
मोठ्या प्रमाणावर राज्यातील शासकीय शाळांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील शिक्षक निवडणूक ड्युटीवर आहेत. यामुळे अनेक शाळा विद्यार्थी आले तरी त्यांना शिकवू शकत नाहीत. कारण या शिक्षकांना आधीच मतदान केंद्रे नेमून दिलेली आहेत. त्यांना त्यांचे साहित्य ताब्यात घेऊन त्या मतदान केंद्रांवर पोहोचायचे आहे. बरीच तयारी बाकी आहे, यामुळे हे शिक्षक शाळेत येऊ शकत नाहीत. यामुळे ज्या ठिकाणी या कारणामुळे शाळा भरविता येणे शक्य नाही तिथे शासनाने शाळांना सुट्टी घेण्यास सांगितले आहे.
अशा ठिकाणच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे पत्र राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ संदर्भात १८, १९, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सट्टीबाबत उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी राज्यातीळ सर्व शाळांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील शाळांमधील मुख्याध्यापकांना पाठविले आहे.

उपसचिवांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी काल गुरुवारी राज्यातील शाळांना पात्र पाठवले आहरेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दि. १८.१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे पत्रकार म्हंटलं आहे.
पहाटे शिक्षक घरी आल्यास ते दुसऱ्या दिवशी कसे काम करणार?
शिक्षण विभागाच्या शाळांच्या सुट्टीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयबद्दल शिक्षकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. २० रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक ड्युटीवर असणारे शिक्षक मतदान केंद्रातून रात्री उशीरापर्यंत मतदानाच्या मशीनच्या पेट्या निवडणूक विभागातील स्ट्रॉंगरूममध्ये आणून जमा करतात. रात्री बारा ते १ देखील वाजतात. त्यानंतर निवडणूक विभागाच्या कार्यालयापासून जे शिक्षक राहतात त्यांना घरी जाणे शक्य आहे. मात्र, जे लांब राहतात त्यांना दुसऱ्या दिवशी फाटले घरी येऊन नंतर सकाळी शाळेत जाणे शक्य होणार नसल्याची भावना शिक्षकांतुन व्यक्त केली जात आहे.
शिक्षक संघटनेची शासनासोबत चर्चा
शिक्षण विभागाच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाबद्दल शिक्षक संघटनेची वरिष्ठ पातळीवर शासनासोबत चर्चा सुरु आहे. दि. १८ रोजीची शाळांची सुट्टी रद्द करून १९ ते २१ पर्यंत सुट्टी वाढवावी अशी मागणी शिक्षकांकडून केली जात असल्याने याबाबत शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा सुरु आहे.