सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी महाबळेश्वर शहरातील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांची प्रभात फेरी काढून मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत आहेत.
शाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे अशा विविध आशयाचे फलक घेऊन व मतदार राजा जागा हो,लोकशाही चा धागा व्हो, वृद्ध असो वा जवान सर्वजण करा मतदान अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाबळेश्वर शहरात शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीमध्ये शिक्षक, शिक्षीका, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने या सप्ताहामध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला व रांगोळी या स्पर्धानबरोबरच पालकांना मतदान करण्याचे आवाहन पत्र लेखन करण्यात आले या उपक्रमांमध्ये विदयार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.
आपली लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी येणाऱ्या विधासभा निवडणुकीच्या वेळी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहनही महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वीनी पाटील यांनी या निमित्ताने केले आहे.