राज्य शासनाच्या महासंस्कृती महोत्सवात शाळा क्रमांक 3 कराड तालुक्यात प्रथम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असल्याने या निमित्त राज्य शासनाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या शाळांनी देखील सहभाग घेतला होता. यामध्ये शाळा क्रमांक 3 ने कराड तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

जिल्हाधिकारी जितेंद्रसिंह डुडी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन कराड येथील टाऊन हॉल येथे केले होते.

या महोत्सवात कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 च्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या शिवजन्म सोहळ्याचा प्रथम क्रमांक मिळाला. याबद्दल शाळेतील इयत्ता चौथीचे विद्यार्थी व मार्गदर्शक सौ. सुशिला जाधव, अंजली कदम, सौ. ज्योती किर्तीकुडवे, सौ. सिमा दाभाडे, शिवानंद स्वामी व मनोज बारोळे यांचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी अभिनंदन केले.