जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; मुलाच्या स्वागतासाठी फुले, हार-तुरे अन् फुगेही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सुट्टीच्या माहोलातून ‘स्कूल चले हम’ म्हणत आज शनिवारी जिल्हा परिषदसह नगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी दाखल झाले. पण तरीही पालकांना सोडून वर्गात बसण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे रडवेले झाले होते. विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यासाठी शाळांचे शर्तीचे प्रयत्न काही ठिकाणी अपुरे पडले. शाळेसह वर्गांना सजावट करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन अनेक शाळांनी स्वागत समारंभ उत्साहात घेतला. एकंदरीत जिल्ह्यातील २ हजार ६८२ शाळांची पाहिली घंटा आजपासून वाजण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पट संख्येच्या कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 मध्ये नवागतांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिलीचे 400 पैकी 400 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.

विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व त्यांच्या मनात शाळेविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा प्रवेशोत्सव घेण्यात येतो. यंदाही सातारा जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या वतीने सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. जिल्ह्यात कराड तालुक्यातील बहुतांश शाळांनी हार तुरे, फुले, फुगे आदी सजावटीद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ग्रामीण भागामध्ये अनेक शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांसह माजी शिक्षक व स्थानिक पदाधिकारी यांचे सहकार्य घेण्यात आले.

e78c07c7 77be 4dbd a5d3 92da5fd234c7

विद्यार्थ्याने मोठ्या आनंदाने स्वागत

सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळांमध्ये आज विद्यार्थ्याने मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये आकर्षक सजावट देखील करण्यात आली हाती. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे पालक देखील शाळेत आले. काही शाळांनी विद्यार्थ्यांप्रमाणे पालकाचे देखील स्वागत केले, असल्याची प्रतिक्रिया सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

सातारा जिल्ह्यात शाळांची संख्या

विद्यार्थी संख्या : ४ लाख १० हजार
खासगी विनाअनुदानित शाळा : ३२
अनुदानित शाळा : ६१४
जिल्हा परिषद शाळा : २,६८२
नगरपालिका शाळा : ५२