सातारा प्रतिनिधी | फलटण विधानसभा मतदार संघातील निवडणूक उमेदवारांच्या लेखा तपासण्याचे वेळापत्रक फलटण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
सकाळी 3 ते 5 या वेळेत 9 नोव्हेंबर प्रथम तपासणी, 13 नोव्हेंबर रोजी द्वितीय तर 17 नोव्हेंबर रोजी तृतीय तपासणी करण्यात येणार आहे.
ही तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी 255-फलटण मतदारसंघ फलटण विधानसभा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष फलटण येथे होणार आहे. तपासणी एकतर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचिरित्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे