खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक;930 ग्रॅम खवले केले जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | खवल्या मांजराच्या खवल्याच्या तस्करी प्रकरणी वन विभागाकडून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 930 ग्रॅम खवले जप्त करण्यात आले असल्याची घटना लोटे, ता. रत्नागिरी व सातारा जिल्हा हद्दीत नुकतीच घडली.

मिलिंद सावंत (रा. मालाड, ता. रत्नागिरी व मीना कोटिया (रा. लोटे ता. रत्नागिरी) असे यांना ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे.

याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लोटे, तालुका रत्नागिरी येथे मिलिंद सावंत व मीना कोटिया हे दोघे अज्ञात इसम खवल्या मांजराच्या खवल्यांची विक्री करता येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर दापोली व चिपळूण वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला. बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दोन संशयित व्यक्ती त्यांना आढळून आल्याने त्यांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या दोन व्यक्तींच्या बॅगेत खवले मांजराची खवले असल्याचे व ते विक्रीसाठी तेथे आले असल्याचे आढळून आले.

त्यानंतर वनविभागाने दोघांना तत्काळ ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 930 ग्रॅम खवले जप्त करण्यात आले आहेत. सदरची कारवाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी दीपक खाडे, साताऱ्याचे मानव वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या नेतृत्वाखाली परिक्षेत्र वनाधिकारी दापोली पी. जी. पाटील फिरते पथक वैभव बोराटे यांचे मार्फत करण्यात आली. सदर मोहिमेत वनपाल सुरेश उपरे, वनपाल सत्ताप्पा सावंत, उमेश आखाडे, तसेच वनरक्षक शुभांगी गुरव, अशोक ढाकणे, अश्विनी जाधव, कृष्णा इरमले हे सहभागी झाले होते. पुढील तपास परिक्षेत्र वनाधिकारी पी. जी. पाटील राजश्री किर करीत आहेत. या कामी कराड होऊन चिपळूणला येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी दीपक खाडे यांनी आभार मानले