कराड प्रतिनिधी | खासदार शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. शरद पवार यांचा हा दौरा राजकीय दृष्टीने महत्वाचा मानला जात असून या दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सातारा जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकी साठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे यांनी उमेदवारी मिळण्याबाबत अर्ज दाखल केला आहे.
प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. १५ दिवसांच्या मुदतीत १७ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.