सातारा प्रतिनिधी | उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या आनंदोत्सव अर्थात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शुक्रवारी सातारकर यांची लगबग दिसून येत होती. सातारा शहरातील मोती चौक, राजवाडा परिसरात फळे, फुले ,पाने ,पत्री तसेच विविध प्रकारचे मोदक खरेदीसाठी सातारकरांची झुंबड उडाली होती.
राजवाडा परिसरातील जनसेवा फ्रुट स्टॉलवर असलम बागवान यांनी देश-विदेशातील अनेक उत्कृष्ट प्रतीची फळे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत .बिगर मोसमी आंबाही या फळात दिसत असून सफरचंद, पेर ,डाळिंब, चिकू, चकुत्र, अननस, पपई ,स्वीट चिंच, च्यनामना, आलू बुखार याशिवाय देशी केळी, संत्री, मालटा, पेर ,पीच, चेरी अशी अनेक फळे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.
बाप्पाला आवडणाऱ्या माव्याच्या मोदकासोबतच स्ट्रॉबेरी ,गुलकंद, पिस्ता ,काजू ,बटरस्कॉच प्रकारचे साच्यात घातलेले मोदकही विक्रीसाठी उपलब्ध असून याला मोठी मागणी आहे. तसेच शेवंती, गुलाब, निशिगंध, चाफा, झेंडू, बेंगलोर गुलाब आधी प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असून हार आणि वेण्या खरेदीसाठीही सातारकरांची झुंबड उडाली आहे.
मोती चौक परिसरामध्ये पत्री ,कमळ ,केवडा, विड्याची पाने आधी पूजा साहित्यासाठी ही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत या खरेदीसाठी तसेच पूजा साहित्यामध्ये केशर ,अष्टगंध, हळद कुंकू ,जानवी जोड, उदबत्ती, अत्तर, निरांजन वाती खरेदीसाठी ही मोठी गर्दी दिसून येत होती.