बनावट दारू बनवणाऱ्या टोळीच्या अड्यावर छापा, 7 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त; 4 जणांना अटक

Police raids hideout of fake liquor gang News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात बनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने जिल्ह्यातील सातारा, कराड व फलटण येथे बनावट दारु तयार करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत एकूण रुपये 7 लाख 36 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. तसेच 4 जणांना अटक केली असून त्यांना आज … Read more

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींकडून जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा बैठकीत आढावा; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Jitendra Dudis News

कराड प्रतिनिधी । जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमान्वये पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या व प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा, न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेल्या प्रकरणांचा, अत्याचारांना बळी पडलेल्या व्यक्तींना देण्यात आलेल्या अर्थसहाय्य मंजूरी तसेच … Read more

40 वर्षांची सातारकरांची चिंता मिटणार! कास-सातारा पाइपलाईन कामाबाबत उदयनराजेंचं परिपत्रक

jpg 20230627 124506 0000

कराड प्रतिनिधी | केंद्रशासनामार्फत अमृत योजनेमधून 102.56 कोटी रुपयांचा अतिरिक्त नवीन एम.एस.पाईपलाईनचा प्रकल्प मंजूर करुन घेण्यात आला आहे. कास ते सातारा नवीन अतिरिक्त पाईपलाईनचे काम सातारकर यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि मैलाचा दगड ठरणारे काम आहे. हे महत्वपूर्ण काम पूर्णत्वाकडे जात असल्याने, पुढील सुमारे 40 वर्षांची सातारकरांची चिंता मिटली असल्याची माहिती भाजपचे खासदार उदयनराजे भोसले … Read more

सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस

Satara ZP

कराड प्रतिनिधी | राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्यावतीने केले जात आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहेे. या प्रणालीच्या वापरातून सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे निवडलेल्या ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहे. सातारा जिल्ह्यातील पेपरलेस ग्रामपंचायतीसाठी निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अकरा तालुक्यातील प्रतेकी 10 ग्रामपंचायतींना … Read more

Satara News : ट्रॅक्टर ट्राॅली कालव्यात कोसळून 4 महिलांचा बुडून मृत्यू, 2 महिलांची प्रकृती गंभीर

Satara News

Satara News | साताऱ्यातील कारंडवाडीत मोठी दुर्घटना घडली आहे. शेतातून घरी परत येताना ट्रॅक्टर ट्राॅली कण्हेर उजव्या कालव्यात कोसळून एकाच गावातील चार महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर पाण्यात बुडालेल्या दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. कारंडवाडी गावावर शोककळा कारंडवाडी गावातील चार महिलांच्या अपघाती मृत्युने संपूर्ण … Read more

‘तू गल्‍लीत खूप दादागिरी करतो’, म्हणत पाठलाग करून पोलिसालाच लाकडी दांडक्याने मारहाण

jpg 20230618 083243 0000

कराड प्रतिनिधी | अनेकवेळा काही किरकोळ कारणावरून वाद होत असतात. मात्र, वादात रागाच्या भरात कोणी काय करेल याचा नेम नाही. अशीच रागाच्या भरात चक्क पोलिसाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सातारा शहरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सातारा शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याला पाठलाग करत मारहाण केल्‍याप्रकरणी चौघा जनाविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्‍यात … Read more

CRIME NEWS : साताऱ्याच्या पोलिसांचा नादच खुळा!! वेशभूषा करून फिल्मी स्टाईलने आरोपींना डोंगरात गाठलं अन नंतर…

Crime News-2

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका व्यवसायिकास वडिलांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी 5 लाखांची खंडणी न दिल्याने धारधार हत्याराने वार करून या गुन्ह्यातील आरोपी पसार झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा शोध घेतला जात असताना आरोपींना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून डोंगरातून फिल्मी स्टाईलने ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी वेशभूषा करत पळून जाताना आरोपींना पाठलाग करून पकडले. यामध्ये … Read more

Satara News : पालकमंत्र्यांनी बालहट्ट सोडावा, नागरीकांची पोवई नाक्यावर बॅनरबाजी

Satara News

सातारा प्रतिनिधी । पोवई नाक्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा आयलँड उभा करण्यात येणार असून याला सातारकर जनतेचा आणि शिवप्रेमींचा विरोध वाढला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बालहट्ट सोडावा अशी मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. हातात बॅनर घेऊन नागरिकांनी पालकमंत्री देसाई यांचा निषेध केला आहे. शिवतीर्थावर अन्य कोणाचाही आयलँड नकोय. जर साताऱ्यात शिवतीर्थावर इतर कोणाचा … Read more

उधारीचे पैसे मागितले म्हणून तिघांनी चाकू काढत थेट केला खुनाचा प्रयत्न; पण पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 1 1

सातारा प्रतिनिधी । एखाद्याला उधार पैसे दिले तर परत वारंवार मागणाऱ्याचा राग हा उधार घेणाऱ्या व्यक्तीला येतोच. कधी कोण पैसे परत देतो तर कधी कोण देठी नाही. मात्र, उधारीच्या पैशापायी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जाणे हि खूप गंभीर घटना आहे. अशीच घटना सातारा शहरात घडली आहे. जुनी उधारी मागितल्याच्या कारणावरुन चिडून जावून तीन जणांनी एकाला जीवे … Read more

आता गाई-म्हैशींच्या खरेदीवर मिळणार तब्बल 50 टक्के अनुदान !

50 percent subsidy cows and buffaloes News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल … Read more

साताऱ्यात चौकाच्या नामांतरावरून वाद पेटण्याची चिन्हे, राजमाता कल्पनाराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; शंभूराज देसाईंबद्दल तक्रार?

satara dispute over shivtirtha name changing

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडकेसातारा शहरातील शिवतीर्थ येथील पोवई नाक्याच्या चौकाला लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याच्या घाट घातला जात आहे. याबाबतच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. नामांतराच्या या चर्चेनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार उदयनराजे भोसले गटात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना … Read more

…तर साताऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करु : सुशांत मोरे यांचा इशारा

Sushant More

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोवई नाका अर्थात शिवतीर्थ हे सातारा शहराचे वैभव आहे. मात्र, याठिकाणी असलेले चित्र राजकीय दडपशाहीच्या जोरावर बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पायदळी तुडवून नामांतरणाचा घाट घातला जात आहे. हि गोष्ट सातारकरांना बिलकुल मान्य नाही. त्यामुळे हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा सातारकरांच्या अस्मितेसाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या विरोधात आत्मक्लेश … Read more