थायलंडचं तिकीट देऊन साताऱ्याच्या 4 तरुणांना घातला साडे तीन लाखांचा गंडा

Satara News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीने थायलंड ट्रिपचे तिकीट देतो, असे सांगून साताऱ्यातील चार तरुणांना तब्बल ३ लाख २५ हजारांचा गंडा घातलयाची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपिंदर सिंग (रा. बलदेवनगर, अंबाला सिटी, हरयाणा), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तळ्याची झाली मोठी दुरावस्था; आहे एका अलंकाराचं नाव?

Satara News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । शहरांमध्ये पाणी साठवून राहावे व सौंदर्यात भर पडावी यासाठी छोटीछोटी तळी तयार करण्यात आली आहेत. काही ऐतिहासिक अशी तळीही सातारा शहरात आहेत. यामध्ये मंगळवार तळे, रिसालदार तळे, फुटके तळे, महादरे तळे, फरासखाना तळे आदी आहेत. यात एका अलंकाराचे नाव असलेल्या मोती तळल्याची सध्या दुरावस्था झाली आहे. सातारा शहरातील ऐतिहासिक अशा अनेक वर्षांपासून … Read more

सारथी संगणक प्रणालीवरील तांत्रिक अडचणीबाबत ‘प्रादेशिक परिवहन’तर्फे महत्वाची माहिती

Satara News 28 jpg

सातारा प्रतिनिधी । परिवहन विभागाची वाहन सेवा व सारथी सेवा या नागरिकांना (अर्जदार) यांना ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामधील सारथी संगणक प्रणालीला वापरकर्त्यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत आहेत. काही कालावधीतच सारथी संगणकीय प्रणालीशी असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील व सारथी संगणक प्रणाली सुरळीतपणे चालू होईल, असेप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद … Read more

प्लास्टिकसह कचरा उघड्यावर फेकणाऱ्यांनो सावधान; भरावा लागले ‘इतका’ दंड

Satara News 27 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता मोहीम घेत ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. मात्र, अजून काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असून प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याने यावर बंदी घालण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी गाव … Read more

निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 2024 02 03T192505.098 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लक्षपूर्वक व काळजीपूर्वक दिलेल्या सूचना समजून घ्याव्यात व त्याप्रमाणे आपापल्या नेमून दिलेल्या जबाबदा-या पार पाडाव्यात असे निर्देशही दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज कायदा … Read more

साताऱ्यात ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 2024 02 03T164453.940 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महागाई, बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. या संकटाच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना आधार देण्याची गरज आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने दुर्लक्ष केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, युवकचे अध्यक्ष मकरंद … Read more

तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांनी कागदपत्रे व बायोमॅट्रिकसाठी उपस्थित राहावे : नागेश पाटील

Satara News 2024 02 03T124804.007 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील तलाठी पदभरती 2023 साठी टि.सी.एस. कंपनीमार्फत घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.satara.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द केली आहे. सदर निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत कागदपत्रे तपासणी व टी.सी.एस. कंपनीमार्फत बायोमेट्रीक तपासणी … Read more

साताऱ्यात चार बहिणींची फसवणूक, खोट्या प्रतिज्ञापत्राने दोघांनी हडपली 2 कोटींची जमीन

Crime News 20240202 222056 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | चार बहिणींच्या नावे असलेली सुमारे १ कोटी ९५ लाख रुपये किंमतीची १३ गुंठे जमीन खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुलदीप संपतराव पवार, अजित विश्वास कदम अशी दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आशालता उध्दवराव निकम (वय ६२, रा. करंजे, ता. सातारा) यांनी पोलीस … Read more

…तर शिवतीर्थावर शिवजयंती दिनी आत्मक्लेश,सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा इशारा

Satara News 20240202 195515 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पोवईनाका येथील शिवतीर्थाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत यशवंतराव चव्हाण पुतळा परिसरात नो- फ्लेक्स झोनच्या ठरावाची कडक अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवजयंती दिनी शिवतीर्थावर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे. ठराव झाला, पण कारवाई नाही सातारा नगरपालिकेने ६ जानेवारी २०२३ रोजी नो फ्लेक्स झोनचा ठराव केला आहे. … Read more

शाळा परिसरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 2024 02 01T181601.570 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या तंबाखू खणाऱ्यासह धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून जनजागृती देखील केली जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई देखील केली जात आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक … Read more

नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घ्या : जितेंद्र डुडी

Satara News 2024 02 01T164009.905 jpg

सातारा प्रतिनिधी । 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक असून त्यासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य, सरपंच, बीएलओ यांची मदत घ्यावी. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करावे, नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा सर्व नोडल अधिकारी, प्रांताधिकारी … Read more

सदोष तलाठी भरतीची SIT व CBI मार्फत चौकशी करण्याची ‘आप’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Satara News 2024 01 31T133045.713 jpg

सातारा प्रतिनिधी । सदोष तलाठी भरती प्रक्रियेची एसआयटी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शासनाच्या सर्व विभागांच्या रिक्त जागा भरून बेरोजगार युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आज आम आदमी पार्टीच्या … Read more