सोशल मीडियावर समर्थकांच्चा रंगतोय सामना; आरोप-प्रत्यारोपांतून मतदारांचे होतेय मनोरंजन

Satara News 40

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आरोप- प्रत्यारोपांनी हळूहळू वातावरण गरम होऊ लागले आहे. सोशल मीडियावर तर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल वॉर सुरू झाले आहे. व्हॉट्सअॅप, उजाडल्यापासूनच फेसबूकवर एकमेकांविरोधात पोस्ट करून एकमेकांची उणी दुणी काढली जात आहेत. उमेदवार या सर्व गोष्टींपासून दूर … Read more

प्रचारासाठी जीप 3900 तर वाहनरथ 5 हजाराचा दर; निवडणूक आयोगाने खर्चासाठी वाहनांचे दर केले निश्चित

Satara News 41

सातारा प्रतिनिधी | राज्यात २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारात उमेदवारांना वापराव्या लागणाऱ्या वाहनांसाठी निवडणूक आयोगाने दर निश्चित केले आहेत. जीप, टाटा सुमो, तवेरा या चारचाकी वाहनांसाठी ३९०० रुपये दर आहेत. तर रॅली, वरातीच्या रथासाठी ५ हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याची मर्यादा आयोगाने घातली आहे. दुचाकी ११०० … Read more

कंटेनरला कारची पाठीमागून धडक; रायगावात अपघातात कार चालकाचा मृत्यू

Crime News 20241106 085721 0000

सातारा प्रतिनिधी | रायगाव (ता. सातारा) हद्दीत महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक बसली. या घटनेत कारचालकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. दिलीप भास्कर सातपुते (वय २९, रा. नागोळे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), सुरेखा अशोक होलमुखे (वय ४७, रा. करवडी, ता. सातारा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. कारचालक दिलीप भास्कर सातपुते … Read more

जिल्ह्यातील 488 ग्राहकांच्या वीजबिलांचे चेक बाऊन्स; 3 लाख 66 हजारांचा दंड

Satara News 20241105 210758 0000

सातारा प्रतिनिधी | वीजबिलाचा भरणा करण्यासाठी दिलेला धनादेश न वठल्यामुळे (चेक बाऊन्स) जिल्ह्यातील ४८८ ग्राहकांना तीन लाख ६६ हजार रुपयांचा बँक चार्जेसचा भुर्दंड बसला आहे. विविध कारणांसाठी धनादेश वठत नसल्यामुळे ग्राहकांनी महावितरणचा वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइनसह अन्य पर्यायांचा वापर करणे आवश्यक आहे. महावितरणने वीजबिल ‘भरण्यासाठी ‘ऑनलाइन’द्वारे विविध पर्याय उपलब्ध केलेले आहेत, तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष रोख … Read more

साताऱ्यातील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त; पोलीस विभागासह भरारी पथकाची संयुक्त कारवाई

Crime News

सातारा प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. दरम्यान, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत सोनगाव तर्फ येथे पोलिस विभाग आणि भरारी पथकाच्यावतीने नुकतीच संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या … Read more

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ई-सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

Crime News 2

सातारा प्रतिनिधी । भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला संबंधित इसम परराज्यातील … Read more

Vasota Fort : वासोटा किल्ला पर्यटनासाठी झाला खुला; जल व जंगल सफारीचा घेता येणार अनुभव

Vasota Fort News

सातारा प्रतिनिधी । राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा (Vasota Fort) ट्रेक शुक्रवारपासून सुरू झाला असून याचा पर्यटक मनमुरादपणे आनंद घेत आहेत. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक … Read more

जिल्ह्यातील भावी गुरुजी देणार 13 केंद्रांवर परीक्षा; 10 नोव्हेंबर रोजी देणार पेपर

Satara News 34

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दि. १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यातील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम … Read more

साताऱ्याचा सज्जनगड हलगी-तुतारीचा निनादासह मशालोत्सवाने उजळला

Satara News 20241103 120201 0000

सातारा प्रतिनिधी | फटाक्यांची आतषबाजी, हलगी-तुतारीचा निनाद आणि धगधगत्या शेकडो मशालींनी जणू काही अवघा आसमंतच उजळून निघाला होता. या वातावरणात दिवाळीच्या पहिल्या पहाटे सज्जनगडावर मशालोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषात शेकडो धगधगत्या मशालींनी किल्ले सज्जनगडावर लख्ख प्रकाश पडला होता. दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेला मशालोत्सव गुरुवारी पहाटे … Read more

सातारा जिल्ह्यात 18 हजार हेक्‍टरवर रब्‍बीची पेरणी

Satara News 20241103 101656 0000

सातारा प्रतिनिधी | मॉन्सूनोत्तर पाऊस थांबल्‍याने आता जिल्ह्यात शेतकऱ्यांची रब्बी पिकांच्या पेरणीची गडबड सुरू झाली. यंदा या हंगामात जिल्ह्यात दोन लाख १३ हजार २०९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, आतापर्यंत १८ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, मका व हरभऱ्याची पेरणी झाली आहे, तसेच खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा पावसाचा कालावधी दिवाळीपर्यंत सुरू … Read more

जिल्ह्यातील धरण परिसरातील ‘त्या’ बांधकामांवर कारवाई करा; सुशांत मोरे यांनी केली मागणी

Satara News 20241031 164106 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील धोम, कोयना, कण्हेर आणि उरमोडी धरणांच्या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या बांधकामांवर तातडीने कारवाईची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ॲड. तृणाल टोणपे, ॲड. निकिता आनंदाचे यांच्यामार्फत सातारा जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहायक वनसंरक्षक तसेच पर्यावरण, वन … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील गावकऱ्यांनी घेतला फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा वसा

Satara News 25 1

सातारा प्रतिनिधी । देशभरामध्ये सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. दिव्यांच्या प्रकाशामध्ये आणि आतिषबाजीमध्ये दिवाळी साजरी केली जाते. मात्र सध्याच्या हवामानाच्या स्थितीमुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. यावर आता सातारा जिल्ह्यातील एका गावाने स्युत्य निर्णय घेतला आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे चिंचनेर वंदन गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शूरवीर सैनिकांची नगरी … Read more