हॉटेलमध्ये जेवण करून जाणाऱ्याला तरुणाला तिघांनी लुटले; पोलिसांनी केली अटक

Satara News 2024 03 17T111012.991 jpg

सातारा प्रतिनिधी | हाॅटेलमधून रात्री जेवण करुन घरी जाणाऱ्या तरुणाचे अपहरण करुन त्याच्याकडील मोबाईलसह ७५ हजारे लुटल्याची घटना साताऱ्यातील औद्योगिक वसाहत परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईलसह ७५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. विनीत संजय कदम (वय २१, रा. झेंडा चाैक नवीन औद्योगिक वसाहत सातारा), मनोहर विठ्ठल भोसले … Read more

साताऱ्यात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते महिलांचा सत्कार

Satara News 2024 03 16T124008.156 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील श्री. ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीने नुकताच महिलांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी उपस्थिती लावली होती. “शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व त्या यशस्वी करण्यासाठी महिलांच्या विविध गटांनी सहकार्य करावे. त्यांनी शासकीय योजनांला लाभ घेण्यासाठी पुढे यावे,” अशी अपेक्षा जिल्हा कृषी अधीक्षक फरांदे यांनी यावेळी व्यक्त केली. … Read more

शिक्षकाचे कुटूंब बाहेर गेले असता चोरट्यांनी मारला सोन्याच्या दागिन्यांसह 10 लाखांवर डल्ला

Crime News 20240316 095550 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराजवळील खेड येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भरदविसा कडी तोडून १० लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास करण्यात आला. यामध्ये सोन्याचे २९ तोळे दागिने, रोख रक्कमेचा समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. तर पोलिसांनी विविध पातळीवर चोरट्याचा शोध सुरू केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

जिल्ह्यात सुरू झाली दुचाकी वाहनांसाठी MH 11 DQ नवीन मालिका; ‘प्रादेशिक परिवहन’ने केले ‘हे’ आवाहन

RTO News jpg

सातारा प्रतिनिधी | दुचाकी वाहनासाठी एमएच 11 डीक्यु ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका दि. 18 मार्च 2024 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी … Read more

सातारा नजीक वन परिमंडल कार्यालयात पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट

Satara News 20240314 131838 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरानजीक असलेल्या परळी येथील वन परिमंडल कार्यालयात अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या स्फाेटामुळे वन परिमंडल कार्यालय परिसर हादरून गेला. या घटनेत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा नजीक परळी येथील वन परिमंडल कार्यालयामध्ये आज पहाटेच्या सुमारास ऑफिस स्टोअर मध्ये जोरात … Read more

साताऱ्यातील साडीच्या दुकानावर दरोडा टाकून दहशतवाद्यांनी खरेदी केले होते बॉम्ब तयार करण्याचे साहित्य

Crime News 20240314 090534 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या वर्षी इस्लामिक स्टेट (आयएस) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरवर दरोडा टाकून लुटलेल्या एक लाख रुपयांतून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे. या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ … Read more

जिल्ह्यात हेल्मेट सक्तीबाबत महत्वाची माहिती; अपघात रोखण्यासाठी लवकरच होणार कार्यवाही…

Satara News 83 jpg

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात अपघातातील बळींची संख्या वाढत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात रोखण्यासाठी कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे हे गरजेचे आहे. याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्यानंतर देखील त्या पाळल्या जाणत नसल्याचे लक्षात आल्याने जिल्ह्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या … Read more

साताऱ्यात चहा व्यावसायिकाची आत्महत्या

Crime News 20240312 084350 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील शनिवार पेठेतील चहा व्यावसायिक सूरज चंद्रकांत गवळी (वय 30) यांनी घराच्या मागे असलेल्या जनावरांच्या पत्र्याच्या शेडमध्ये (दि. 10) रात्री 11 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शैलेश चंद्रकांत गवळी (वय 30, रा. 264, शनिवार पेठ) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. सूरज गवळी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप … Read more

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी फडकणार दुसरा 75 फुटी राष्ट्रीय ध्वज; पालिकेनं दिली खर्चासह प्रशासकीय मंजूरी

Satara News 78 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेची नुकतीच अर्थसंकल्सपिय सभा पार पडली. या सभेत सातारा शहरातील अनेक विकासकामांसाठी भरघोस निधींची तरतूद करत प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली. या सभेत दुसऱ्या ७५ फुटी राष्ट्रीय ध्वज उभारणीच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सातारा शहरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली म्हणून ७५ फुटी राष्ट्रीय … Read more

साताऱ्यात पार पडले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचार संहिता प्रशिक्षण

Satara News 64 jpg

सातारा प्रतिनिधी । निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणा-या सर्व यंत्रणांचे कामकाज परस्पर समन्वयाने व उचित पध्दतीने पार पडल्यास जिल्हयातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपणे व सुयोग्य पध्दतीने होईल. त्यासाठी सर्वांनी नियमाप्रमाणे व पारदर्शकपणे जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात नुकतेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगानेआदर्श … Read more

जिल्हा कारागृहातील बंदीसाठी आयुष्मान भारत कार्डसह विविध उपक्रमांचे उद्घाटन

Satara News 62 jpg

सातारा प्रतिनिधी । समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहामध्ये विविध कार्यक्रम तसेच शिबीर नुकतेच घेण्यात आले. कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड यांचे वाटप देखीलकरण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व कारागृह अधीक्षक … Read more

साताऱ्यात अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या परिसरात अल्पवयीन मुलीसह बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Satara News 20240307 082308 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यापासून काही अंतरावर अल्पवयीन मुलीचा सडलेल्‍या अवस्‍थेत तर त्‍याच परिसरात झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरूणी ही सातारा परिसरातील असून तिने आत्‍महत्‍या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच ती एक महिन्‍यांपासून बेपत्ता होती. उग्र वासामुळे घटना उघडकीस अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याच्या बाजूकडून उग्र … Read more