साताऱ्यात वाहतूक पोलिसांनी दीड लाखांच्या 56 सायलेन्सरसह हॉर्नवर फिरवला बुलडोझर

Satara News 2024 03 23T182515.281 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसापासून सातारा शहरात बुलेटसह इतर दुचाकी गाड्यांच्या इंजिनमध्ये आणि सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ मोठ्याने आवाज करत काही दुचाकीस्वारांकडून ध्वनी प्रदूषण केले जात होते. याबाबत वाहतूक पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी देखील मागणी नागरिकांमधून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आज सातारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अभिजीत यादव यांच्या … Read more

लोकसभा निवडणुक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार

Satara News 2024 03 23T160935.070 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची (Satara Lok Sabha Election 2024) आचार संहिता जाहीर झाली आहे. या दरम्यान, आदर्श आचार संहितेचे कुणी भाग करू नये. जर केल्यास संबंधितांवर कडक कारवाई देखील केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग व प्रशासनाकडून 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला. तसेच “नागरिकांनी … Read more

पोलीस अधिकारी असल्याचे सांगत वृद्धाची सोन्याची अंगठी ‘त्यांनी’ केली लंपास

Satara News 2024 03 23T110550.397 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘मै पोलिस इन्स्पेक्टर हू’ असे म्हणत हातातील अंगठी घेऊन कागदात दगड गुंडाळून देत वृद्धाची फसवणूक करण्यात आली असल्याची घटना साताऱ्यातील शाहूपुरी येथे घडली आहे. यामध्ये अज्ञातांकडून २० हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा … Read more

‘तुमच्यावर मनी लाँड्रिंगची केस आहे’ असे सांगत वृध्द डॉक्टरला पावणेबारा लाखाला फसवले

Satara News 2024 03 22T170316.917 jpg

सातारा प्रतिनिधी । दोघाजणांनी मोबाईलवरुन संपर्क करुन “तुमच्यावर मनी लॅंड्रींची केस आहे. तुमच्याबरोबर कुटुंबाला तुरुंगात टाकेन,” अशी धमकी देऊन वृध्द डाॅक्टरकडून सुमारे पावणे बारा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील वृद्ध डॉक्टर सुभाष गणपती घेवारी (वय … Read more

सातारा जिल्ह्यातून 1400 मुली, महिला बेपत्ता; आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुली किंवा महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळत आहे. वृत्तपत्रांमध्ये दररोज मुली अथवा महिला बेपत्ता झाल्याच्या बातम्या येत असतात. मिळालेल्या महितीनुसार आज अखेर आपल्या सातारा जिल्ह्यामधून सुमारे १४०० मुली, महिला बेपत्ता झाल्या असल्याचे समजत आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. बेपत्ता महिला, … Read more

साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं काम बंद पाडलं; नेमकं कारण काय?

Satara News 20240320 093136 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या महिनाभरापासून गतीने सुरू असलेलं साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं बांधकाम मंगळवारी बंद पाडण्यात आलं. तसेच ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी पलायन केलं असून कोणाची तक्रार नसल्याने प्रशानाही मूग गिळून गप्प आहे. या घटनेची सध्या साताऱ्यात उलटसुलट चर्चा आहे. काम बंद ठेवायला कार्यकर्त्यांनी भाग पाडले? साताऱ्यातील कृष्णानगरमध्ये मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून कॉलेजचं बांधकाम … Read more

सातारा पालिकेने 265 जणांना बजावली दंडात्मक कारवाईची नोटीस

Satara News 2024 03 19T190642.315 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सातारा शहरातील तब्बल २६५ बोगस नळ कनेक्शनधारकांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. या नळनधारकांना पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली असून, दंड भरून नळकनेक्शन नियमित न करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, सातारावासीयांना पाणीटंचाईबरोबरच पाणीकपातीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका … Read more

साताऱ्यात कोयत्याचा धाक दाखवत ‘त्यांनी’ परप्रांतिय तरुणाला लुटले

Crime News 29 1 jpg

सातारा प्रतिनिधी । “तुम्ही सातारा शहराजवळ अपघात केला आहे,” असे सांगत कोयत्याच्या धाकाने परप्रांतिय तरुणाला लुटण्यात आल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. यामध्ये अज्ञातांनी परप्रांतीय तरुणाकडून सुमारे साडे सात हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेत पसार झाले आहेत. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

पैसे न दिल्याने साताऱ्यातील विसावा ग्रुप बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सच्या कार्यालयात तोडफोड

Satara News 20240319 101248 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील विसावा नाका येथे असलेल्या विसावा ग्रुप बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सच्या कार्यलयाची दोघांनी तोडफोड केली आहे. पैसे न दिल्याच्या कारणावरून ही घटना घडली आहे. याप्रकरणी अभयसिंह भोसले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन श्रीरंग यादव (रा. खेड, ता. सातारा) व त्याच्यासोबत … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : प्रतिबंधात्मक कारवाईसाठी सातारा पोलिस ॲक्शन मोडवर

Satara News 2024 03 18T161715.724 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. यासाठी त्यांच्याकडून तब्बल 4 हजार 500 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी … Read more

पोलिसांची साताऱ्यातील 3 जुगार अड्ड्यांवर छापा टाकत कारवाई

Satara News 2024 03 18T122437.832 jpg

सातारा प्रतिनिधी । शाहूपुरी पोलिसांच्यावतीने तीन जुगार अड्‌ड्यांवर छापे टाकत सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मार्केट संकुल परिसर, राजधानी टॉवर परिसर आणि करंजेतील श्रीपतराव शाळा परिसर या तीन ठिकाणी पोलिसांनी नुकतीच कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी शहरातील जुना मोटर स्टॅन्ड येथील श्रीमंत छत्रपती शाहू … Read more

तक्रारींचे निवारण करण्यासाठी 3 अधिकार्‍यांची समिती गठित

Satara News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यापासून आदर्श आचारसंहिता देशभरात लागू झाली आहे. या काळात भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिकार्‍यांनी जप्त केलेल्या रोख रकमांबाबत जनतेची आणि प्रामणिक व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तीन अधिकार्‍यांची समिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गठीत केली … Read more