साताऱ्याचा पाणीपुरवठा सोमवार, मंगळवारी राहणार बंद; नेमकं कारण काय?

Satara News 20240511 120059 0000

सातारा प्रतिनिधी | एन उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या राज्यात सर्वत्र भासत असताना सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. सोमवार (दि. १३) व मंगळवारी (दि. १४) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी वेळ लागणार … Read more

जिल्ह्यातील 11 अधिकाऱ्यांचा उद्या ‘पोलीस महासंचालक पदक’ ने होणार सन्मान

Satara News 20240430 185626 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य पोलीस दलात उल्लेखनीय तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 11 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ (डीजी मेडल) जाहीर झाले आहे. उद्या दि. 1 मे रोजी हे पदक प्रदान केले जाणार आहे. उद्या सन्मान होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, अरुण देवकर, सहायक फौजदार संजय टिळेकर, कमलाकर कुंभार, भरत … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज; 6 हजार 50 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Satara News 20240403 142759 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सातारा लोकसभा निवडणुक २०२४ साठीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिसांनी सुमारे ६ हजार ५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून परवानाप्राप्त ३ हजार २२८ अग्नीशास्त्रांपैकी १ हजार ९६२ अग्निशाख पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात संवेदनशील अठरा क्षेत्र असून प्रत्यक्ष २१ मार्गावर पोलिसांनी रूट मार्च … Read more

थकबाकी शून्य करा आणि अखंडित वीज सेवेसाठी यंत्रणा अद्ययावत् ठेवा – अरविंद भादीकर

MSEB News 20240402 104151 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विजेची थकबाकी शून्य करा, तसेच ग्राहकांना अखंडित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्रातील यंत्रणा अद्ययावत् ठेवा, वेळोवेळी रोहित्रांची देखभाल-दुरुस्ती करा, अशा सूचना ‘महावितरण’चे नूतन संचालक अरविंद भादीकर यांनी केल्या. ‘महावितरण’चे नूतन संचालक अरविंद भादीकर यांनी नुकतीच सातारा क्षेत्रीय भेट दिली. यावेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालक भादिकर यांनी अधिकाऱ्यांना … Read more

आ. शिवेंद्रराजेंना वाढदिवसानिमित्त खा. उदयनराजेंची ‘जादू की झप्पी’; म्हणाले, लहानपणी त्यांच्यामुळे मी मार खाल्लाय

Satara News 20240330 191605 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे चुलत बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दुपारी थेट शिवेंद्रराजेंच्या सुरूची निवासस्थानी जास्थानी जाऊन खास स्टाईलने शुभेच्छा दिल्या. आमचे लहानपणीचे फोटा पाहा. यांच्यामुळे मी लहानपणी मार खाल्लाय, अशी आठवण उदयनराजेंनी सांगताच उपस्थितांना हसू आवरलं नाही. वाढदिवसाला जाणार … Read more

महाराष्ट्रात महायुती एकत्र, लोकसभेच्या 42 जागा जिंकेल : नीलम गोऱ्हे

Nilam Gorhe News 20240330 115653 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती लोकसभेच्या ४२ जागा जिंकेल, असा विश्वास सभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय अजून जाहीर करण्यात आलेला नाही. या पत्रकार परिषदेवेळी शिंदे गटाच्या शारदा जाधव उपस्थित होत्या. नीलम गोऱ्हे … Read more

जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई : गुंड दत्ता जाधवसह 22 सराईत गुन्हेगारांच्या घरावर फिरवला बुलडोझर

Crime News 20240327 142400 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शहरातील गुंडांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला. तब्बल २२ गुन्हेगारांची यादी तयार करून प्रशासन बुधवारी सकाळी प्रतापसिंह नगरात बुलडोझर घेऊन पोहोचले. संबंधित २२ गुन्हेगारांची घरे शोधून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यास सुरूवात केली. दुपारी बारापर्यंत ११ घरावर बुलडोझर फिरविण्यात आला. या कारवाईसाठी जिल्हा पोलिस … Read more

साताऱ्यातील हिल मॅरेथॉन ‘या’ दिवशी होणार, असे असणार यंदाचे नियोजन

Satara News 3 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी सातारकरांसाठी हिल मॅरेथॉन स्पर्धा भरविली जाते. या स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात आली असून यंदा हिल मॅरेथाॅन दि. १ सप्टेंबरला होणार असून त्याचा सराव दि. १२ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी हिल मॅरेथॉन आयोजकांची नुकतीच बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अध्यक्षपदी डॉ. अदिती घोरपडे … Read more

सातारा शहराचा पारा 39 अंशाच्या उंबरठ्यावर; उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही – लाही

Satara News 2024 03 25T175252.420 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा मार्च महिन्यातच चांगलाच तापला असून सातारा शहराचा पारा तर ३९ अंशाच्या उंबरठ्यावर पोहाेचला आहे. सर्वत्र दुपारच्या सुमारास रखरखीत ऊन पडत असून चांगला चटकाही जाणवत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाही- लाही होत आहे. यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्हा पारा अनेकवेळा ४० … Read more

जिल्ह्यात चक्क 3528 आजी – आजोबांनी दिली 745 परीक्षा केंद्रांवरून अनोखी परीक्षा

Satara News 2024 03 25T173221.656 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वसाक्षरता अभियानंतर्गत जिल्हास्तरावर शिक्षण विभागाकडून अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. तसेच कुणीही निरक्षर राहू नये, या उद्देशाने शासन स्तरावरून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येतो. काही दिवसांपूर्वी निरक्षरांच्या नोंदी घेत त्यांना साक्षर करण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील ७४५ परीक्षा केंद्रांवर नुकतीच चक्क ३ हजार ५२८ आजी-आजोबांनी उपस्थिती लावत … Read more

सातारा एलसीबीने 12 तासात घरफोडीच्या गुन्ह्याचा केला पर्दाफाश, तिघांना ठोकल्या बेड्या

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत हद्दपारीचा भंग करून वावरत असलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. सातारा शहरातील करंजेपेठ येथील समर्थ भांडी दुकानाचा पत्रा उचकटून १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी … Read more

साताऱ्यातील कंपनीच्या आवारात आढळले बिबट्याचे 3 बछडे, एक निघाला ब्लॅक पँथर!

Satara News 2024 03 25T110830.976 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील एका कंपनीच्या आवारात रविवारी सकाळी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यात एक काळा रंगाचा बछडा होता. त्यामुळे ब्लॅक पॅंथरचा बछडा आढळून आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. या बछड्यांची वनविभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत वैद्यकीय तपासणी केली. नंतर त्यांची मादी बिबट्याबरोबर भेट घडवून आणली. साताऱ्यात आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यांमध्ये एक बछडा पूर्णता काळ्या … Read more