साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Satara News 15 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील विविध रस्ते कायमचे खड्डेमुक्त व्हावे यासाठी काँक्रिटीकरणाचा पर्याय निवडून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असून सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत, असे मत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. श्रीमंत छ. शाहू उद्यान (गुरुवार बाग) येथील … Read more

पोलिसांची तपासणी सुरु असल्याचे सांगत दोघांनी वृद्धाचे 3 तोळ्यांचे दागिने केले लंपास

Shahupuri Police Station Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञात चोरट्यांच्या टोळीकडून अनेकांना अनेक कारणांनी गंडा घातला जात आहे. दरम्यान, अशी एक घटना साताऱ्यात घडली. ‘पुढे चाैगुले साहेबांच्या भावावर चाकूने वार झालेत, पोलिसांची तपासणी सुरू आहे,’ असे सांगून दोघा भामट्यांनी एका वृद्धाकडून तीन तोळ्यांचे दागिने हातोहात काढून घेतली. या दागिन्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये होती. … Read more

सातारा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु : विभागीय आयुक्त सौरभ राव

SataraNews jpg

सातारा प्रतिनिधी । 18-19 या वयोगटातील जे तरुण आहेत. अशा मतदारांची नोंदणी करण्यासाठी 2004 ते 2006 या कालावधीतील जन्म झालेल्या नागरिकांची यादी तयार करावी. तसेच जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळा व महाविद्यलयांमध्ये शिबीराचे आयोजन करावे. त्याचबरोबर छोट्या जाहिराती व स्लोगन तयार करुन प्रसिद्धी करावेत. सातारा जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीचे काम चांगल्या … Read more

Satara News : साताऱ्यात कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानातून 263 शहिदांच्या स्मृतींना उजाळा

Satara News 9 jpg

सातारा प्रतिनिधी । दिल्लीतील इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरिअल स्मारकाच्या धर्तीवर साताऱ्यात एक आगळेवेगळे उद्यान उभारले जात आहे. ते उद्यान म्हणजे कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान होय. पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत विविध युद्धांत शहीद झालेले जवान, त्यांचे नाव, कोणत्या युद्धात हुतात्मा झाले व हुतात्मा झालेली तारीख अशी माहिती असलेल्या एकूण २६३ जवानांच्या कोनशीला या स्मारकात लावण्यात … Read more

‘कास’च्या मुख्य जल वाहिनीला गळती, साताऱ्याचा पाणीपुरवठा ‘इतके’ दिवस बंद राहणार

Satara Kas News 20231122 090700 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कास पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला कासाणी व आटाळी येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पालिकेकडून उद्या गुरुवार, दि. २३ रोजीपासून गळती काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी कास योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कास ही सर्वात जुनी पाणीयोजना असून, या योजनेतून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या … Read more

पती-पत्नीच्या वादाचा Instagram वरील मित्राने उठविला गैरफायदा; लग्नाचे आमिष दाखवत केलं असं काही…

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । दोघांचा संसार म्हंटलं कि संसारात कधी प्रेम, वाद हे होतातच. वाद झाला तर पती आपल्या जवळच्या मित्रासोबत बोलत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. तर पत्नी त्याच्या जवळच्या नातेवाईक किव्हा घरातील व्यक्तीसोबत बोलते. मात्र, पती व पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने विविध ठिकाणी नेऊन विवाहित तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात … Read more

सातारा जिल्हा रुग्णालयातील भरतीबाबत आरोग्य उपसंचालकांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात असलेल्या मनुष्यबळासाठी राज्य शासनाकडून पाठपुरावा सुरु आहे. आवश्‍यक पदांच्या भरती प्रक्रियेची मोहीम पुढील महिन्यात राबवली जाण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटेल, अशी महत्वाची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सातारा जिल्हा रुग्णालयाच्या 15 वॉर्डसह बाह्य रुग्ण विभागाचा काल डॉ. राधाकिसन … Read more

कास पठारास फुलाच्या हंगामात लाखो पर्यटकांची भेट; जमा झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा महसूल

Colorful flowers on Kas plateau News

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील रंगीबेरंगी रान फुलांच्या फुलोत्सवयामुळे या ठिकाणी लाखो पर्यटक भेटी देतात. यंदाही लाखोहुन अधिक पर्यटकांनी कास पठारास भेटी दिलय असून मागीलवर्षी पेक्षा दुप्पट फुलांबरोबरच तब्बल दीड कोटींचा महसूल जमा झाला आहे. यावर्षी दि. ३ सप्टेंबर रोजीपासून फुलांचा अधिकृत हंगाम सुरू झाला. यावेळी या ठिकाणी भेटी देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना … Read more

सातारा ZP नोकर भरती परीक्षेचा तिसरा टप्पा ‘या’ तारखेपासून होणार सुरु; 5 संवर्गासाठी परीक्षा होणार

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद भरतीचा तिसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. संबंधित भरती प्रक्रियेचा तिसरा टप्पा हा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहेत. सातारा जिल्ह्यातही ३ केंद्रांवर या परीक्षा होत असून दि. १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरू केली आहे. … Read more

संपूर्ण सातारा जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणार : पोलीस अधीक्षक समीर शेख

Sameer Shaikh jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहत असलेल्या लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अनेक गोष्टी केल्या जात आहेत. दरम्यान, संपूर्ण सातारा जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवण्याचा निर्णय आता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याचा प्रारंभ लोणंद पोलीस ठाण्यापासून नुकताच करण्यात आला. या यंत्रणेच्या वतीने ग्रामस्थांना, तसेच अडचणीत असणार्‍या नागरिकांना गुन्हेगारी रोखण्यासोबत पोलिसांचे साहाय्य मिळणार आहे. … Read more

कास धरणाच्या नवीन जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरु

Kas News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला वरदायिनी ठरणाऱ्या कास धरणाच्या नवीन जलवाहिनीच्या कामास पालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या जलवाहिनी एकमेकांना जोडण्याचे काम सुरू असून पुढील आठवड्यात धरणातून बाहेर येणाऱ्या आऊटलेटला नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सातारा पालिकेच्या माध्यमातून कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून पाणीसाठ्यात 0.1 टीएमसीवरून 0.5 टीएमसी इतकी वाढ झाली … Read more

साताऱ्यातील रिअल इस्टेट एजंटचा खून करून मृतदेह पूरला; 2 महिन्यानंतर उघडकीस आली घटना

Satara Police News

सातारा प्रतिनिधी | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी माहिती घेवून काही जणांची धरपकड केली. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हे कृत्य झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more