सातार्‍यात 135 सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतले परवाने

Satara News 20240907 172523 0000

सातारा प्रतिनिधी | सातार्‍यात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला 135 गणेशोत्सव मंडळांनी परवानग्या घेतल्या आहेत. 7 सप्टेंबरपर्यंत परवानगी घेण्याची मुदत आहे. विनापरवाना मंडप उभारणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा सातारा पालिकेने दिला आहे. पावसाच्या सरी झेलत अनेक गणेश मंडळांनी साऊंड व लेझर सिस्टीमच्या दणदणाटात बेधुंद होत गणेश मूर्ती आगमनाच्या मिरवणुका काढल्या. गणेशोत्सवाचा मुख्य दिवस सोडून तब्बल महिनाभर आधीपासूनच गणेश … Read more

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून 70 फूट खाली दांपत्य कोसळले, एकजण जागीच ठार

Accident News 20240907 133216 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा महामार्गावरील पारगाव – खंडाळा येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकीवर कोल्हापूरकडे निघालेले दांपत्य थेट पुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवरील डांबरावर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) आणि उन्नती उपेंद्र चाटे … Read more

पावसाचा आजपासून जोर वाढणार; सातारा जिल्ह्याला आहे ‘हा’ अलर्ट

Satara News 20240907 102950 0000

सातारा प्रतिनिधी | मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाले असून राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत धो धो पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना 3 दिवस अतीमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले असून गणपतीच्या आगमनालाच धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील … Read more

फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडी सरकार येईल; शरद पवारांचे महत्वाचे विधान

Satara News 20240907 100251 0000

सातारा प्रतिनिधी | फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून खटाव-माणचे चित्र बदलेल. येथील सर्व पाणी योजना पूर्णपणे मार्गी लावतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ग्रामविकासाचा दृष्टिकोन रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच शाखांमधून आम्ही पुढे नेला, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले. निढळ, ता. खटाव येथील हनुमान विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर … Read more

नागठाणेत दगडाने ठेचून महिलेचा निर्घृणपणे खून; संशयितास अटक

Satara Crime News 20240907 093105 0000

सातारा प्रतिनिधी | जुन्या भांडणाच्या वादातून महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री नागठाणे येथे घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. कोरी मिशन शौकत भोसले (वय 39) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल ऊर्फ शेर्‍या प्रकाश चव्हाण (वय 35, मूळ रा.लिंब सध्या रा. नागठाणे) याला … Read more

गणेशोत्सवातील नियमाबाबत पालकमंत्री शंभुराज देसाईंचा मोठा निर्णय; म्हणाले की,

Satara News 20240907 085313 0000

कराड प्रतिनिधी | आजपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वापरल्या जाणाऱ्या डीजे आणि लेझर शो बाबत महत्वाची माहिती दिली आहे. ‘गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी या उच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या डेसीबलमध्ये सुरु ठेवता येतील. त्यापेक्षा मोठा आवाज असेल तर कारवाई करण्यात येईल. लेझर लाईटला तर जिल्ह्यात परवानगीच देण्यात येणार … Read more

सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या साडे सात लाख ‘बहिणी लाडक्या’!

Satara News 20240907 080043 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजनेला सातारा जिल्ह्यात प्रतिसाद असून अर्जांची संख्या आठ लाखांजवळ पोहोचली आहे. तर साडेसात लाखांहून अधिक अर्जांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कराड तालुक्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या १ लाख ४१ हजारांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यात योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये येणार आहेत. जून महिन्यात राज्य शासनाने … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

Satara Crime News 20240906 201143 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळच असलेल्या रायगाव फाटा येथे एक भीषण अपघाताची घटना घडली. रुग्णवाहिका आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरची भीषण धडक होऊन छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष पवार (वय २८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दि. ५ रोजी ही रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पवार हे … Read more

संवेदनशील घटनांच्या प्रक्षेपणावर सनियंत्रण समितीचे बारकाईने लक्ष राहणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20240906 180429 0000

सातारा प्रतिनिधी | प्रसार माध्यमे ही समाजाच्या जडण घडणीत महत्वाची भूमिका पार पाडत असतात्. त्यामुळे माध्यमांनी कोणत्याही घटनेचे वृत्तांकन करत असताना ते जबाबदारीने व वस्तुनिष्ठ करावे, असे प्रतिपादन करुन संवेदिनशिल घटनांच्या प्रक्षेपणावर खासगी दूरचित्रवाणी वाहिनी सनियंत्रण समितीचे बारकाईने लक्ष राहणार. यासाठी या समितीची बैठक नियमितपणे घेण्यात येईल, असे निर्देश समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी … Read more

विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी साताऱ्यातील शाहू नगरी सजली

Satara News 20240906 171415 0000

सातारा प्रतिनिधी | उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या आनंदोत्सव अर्थात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शुक्रवारी सातारकर यांची लगबग दिसून येत होती. सातारा शहरातील मोती चौक, राजवाडा परिसरात फळे, फुले ,पाने ,पत्री तसेच विविध प्रकारचे मोदक खरेदीसाठी सातारकरांची झुंबड उडाली होती. राजवाडा परिसरातील जनसेवा फ्रुट स्टॉलवर असलम बागवान यांनी देश-विदेशातील अनेक उत्कृष्ट प्रतीची फळे विक्रीसाठी उपलब्ध केली … Read more

लाडकी बहीण योजनेवरुन शंभूराज देसाईंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावल; म्हणाले की,

Satara News 20240906 161950 0000

सातारा प्रतिनिधी | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्यमुळे आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी हे आम्हाला खटकलं असल्याचं म्हणत अजित पवार गटावर जाहीर नाराजी … Read more

‘प्रधानमंत्री आवास’मध्ये 4,600 घरकुले; लाभार्थ्यांना हक्काचा निवारा

Satara News 20240906 115323 0000

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी सातारा जिल्ह्याला ४ हजार ६०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामुळे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून बेघर, कच्ची घरे असणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची २०१६ पासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात … Read more