कलापथकाच्या माध्यमातून समाज कल्याण योजनांची होणार जनजागृती

Satara News 44 jpg

सातारा प्रतिनिधी । अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती त्यांच्याच सोप्या भाषेत लोककला पथकाच्या माध्यमातून आजपासून ते दि. 15 फेब्रुवारी कालावधीत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी संवाद साधताना दिली. याबाबत जिल्हा माहिती अधिकारी पाटोळे म्हणाल्या की, या कलापथकांचे कार्यक्रम एकूण अकरा तालुक्यात होणार … Read more

जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी 11 तालुक्यात विशेष शिबीराचे आयोजन

Satara News 40 jpg

सातारा प्रतिनिधी । तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्कांचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना विहीत नमुन्यात प्रमाणपत्र/ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील तालुकास्तरावर समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात हे शिबीर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पाटण तालुका दि. 13 … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या ‘मिशन धाराऊ’ अभियान राज्यभर राबविण्याच्या सूचना

Satara News 38 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने एक अभियान सुरु करण्यात आले होते. ते आता राज्यभर राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ माता दुग्धामृतम्’ अभियान सुरू केले होते. या अभियानाचे यश पाहून महिला … Read more

साताऱ्यात मानधनवाढीसाठी आशा अन् गटप्रवर्तकांकडून निदर्शने

Satara News 37 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने आज सातारा जिल्हा परिषदेसमोरआंदोलन करण्यात आले. मानधनवाढीचा अध्यादेश काढावा, यासह विविध मागण्या यावेळी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलनात कल्याणी मराठे, … Read more

साताऱ्यात विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । नवरा बायकोचे भांडण झाल्यास त्याचा लहान मुलांवर देखील परिणाम होतो. कारण त्यावेळी त्या ठिकाणी ते भांडण लहान मुलेही पाहत व ऐकत असतात. त्याबाबत शिक्षा देखील होऊ शकते. असाच काहीसा प्रकार सातारा शहरात घडला असून सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीसमोर बायकोला … Read more

जिल्ह्यात सलग चार दिवस रंगणार राजधानी महासंस्कृती महोत्सव

Satara News 2024 02 07T130415.655 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेवर या तालुक्यांच्या ठिकाणी सांस्कृतीक कार्यविभाग, सांसकृतीक संचालनालय व सातारा जिल्हा प्रशासन यांच्यावतीने राजधानी महासंसकृतीचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी महासंस्कृती महोत्सवाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य त्याचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. … Read more

सातारा ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा याशनी नागराजन यांनी स्वीकारला पदभार

Satara News 2024 02 07T122936.730 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झालयानंतर त्यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर याशनी नागराजन यांनी मंगळवारी ठीक सकाळी पावणे नऊलाच जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर ठीक अकरा वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन विविध विभागांचा आढावा … Read more

जिल्ह्यातील किल्ल्याचे दगडुजीचे सुरू असलेले काम इतिहासप्रेमीं पाडले बंद

Fort Pratapgad News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथे असलेले बुरूज ढासळन्याच्या घटना आपण अनेकवेळा एकल्या असतील. अनेक ठिकाणचे दगड देखील अधूनमधून निघाले आहेत. या किल्याच्या सवर्धनाचे काम सध्या हाती घेण्यात आले असून किल्ल्यावरील ध्वज बुरुजाच्या मुख्य भागाची डागडुजी सुरू आहे. मात्र, काम करत असताना कडाप्प्याचा वापर केला जात आहे. यामुळे किल्ल्याचे सौंदर्य लोप पावत आहे. … Read more

साताऱ्यातील मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळाची खा. उदयनराजेंकडून पुन्हा पाहणी

Sangali News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । पहिला मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘शिवसन्मान पत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात बैंठकीस उपस्थित राहून आढावा घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी … Read more

“वाईन शॉपच लायसन्स मिळवून देतो…” म्हणत दोघांकडून व्यावसायिकाची 75 लाखांची फसवणूक

Crime News 40 jpg

सातारा प्रतिनिधी | मंत्री व मंत्रालयातील सचिवांशी ओळख आहे. वाईन शॉप लायसन मिळवून देतो , असे सांगून साताऱ्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाची तब्बल 75 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विनायक शंकर रामुगडे व कलावती रामचंद्र चव्हाण, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी घनशाम चंद्रहार भोसले (वय 47, … Read more

भीषण स्फोटात मिठाईचे दुकान जळून खाक

Crime News 39 jpg

सातारा प्रतिनिधी । आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास नागठाणे येथे श्री गणेश राजपुरोहित स्वीटमार्ट या मिठाईच्या दुकानात झाला मोठा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरला. स्फोटात मिठाईच्या दुकानाला भीषण आग लागली. याबाबत अधिक माहिती अशी की, नागठाणे येथे श्री गणेश राजपुरोहित स्वीटमार्ट हे मिठाईचे दुकान आहे. या दुकानास आज पहाटेच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. या … Read more

सातारा ZP च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन

Satara News 20240206 072500 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली आहे. नागराजन या आज मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत. तर यामुळे जिल्हा परिषदेला प्रथमच महिला आएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे. नगाराजन या आता ३६ व्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या … Read more