सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांकडून पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 प्रदान

Satara News 23 1

सातारा प्रतिनिधी ।श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, मोहरम सण, आषाढी एकादशी यासह विविध सण व उत्सव साजरे केले जाणार आहेत. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसार अधिकाराचा वापर करुन दि. 5 जुलै ते 19 जुलै या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेल्या … Read more

साताऱ्यात ‘महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणीत चाकणकरांपुढे महिलांनी मांडल्या तक्रारी

Satara News 22 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींबाबत सुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी “महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी. तक्रारींची राज्य महिला आयोग सोडवणूक करुन पिडीतांचे जीवन सुखमय होण्यासाठी … Read more

उदयनराजेंच्या मिरवणुकीत सोनसाखळ्या चोरणाऱ्यांस अहमदनगरमधून अटक; 29 तोळे सोने हस्तगत

Crime News 7 1

सातारा प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुक काढली होती. त्यावेळी सोन्याच्या साखळ्या चोरल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणाचा पोलिसाकडून तपास केला जात होता. दरम्यान, तेवीस दिवसानंतर सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना अहमदनगरमधून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून चार गुन्ह्यांतील २९ तोळे सोने हस्तगत केले आहे. … Read more

युवक-युवतींसाठी खूषखबर; आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी

Satara News 19

सातारा प्रतिनिधी । राज्यातील युवक युवतींसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रांत रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोयी सुविधा देण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 18 1

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील गोडोलीत उभारण्यात येणाऱ्या अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी “राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल देत आहे. या विभागाला तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेायी सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे,” असे … Read more

साताऱ्यात युवकांच्या दोन गटात राडा; राजवाडा चौपाटी परिसरातील घटना

Satara News 17 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील राजवाडा या वर्दळीच्या ठिकाणी युवकांच्या दोन गटात राडा झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या तरुणाच्या राड्याच्या प्रकारानंतर संबंधितांवर कारवाईची मागणी नागरीकांतून केली जात आहे. सातारा पाेलिस दलाने घटनेतील युवकांचा शाेध सुरु केला आहे. सातारा शहरातील राजवाडा परिसर हा शहरवासियांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आवडता परिसर म्हणून ओळखला जातो. या … Read more

Deputy CEO,HDO वर कारवाईची विभागीय आयुक्तांना सूचना, मंत्रालय कक्ष अधिकाऱ्याच्या पत्राने खळबळ

Satara News 16 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती अर्चना वाघमळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचार तसेच आरोग्य विभागात गैरकारभार केल्याचा आरोप करत शशिकांत जाधव यांनी उपोषण केले होते. त्याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. यामुळे … Read more

ST बसची तरुणाला जोरात धडक; एसटी चालकावर गुन्हा दाखल

Crime News 3 2

सातारा प्रतिनिधी । वाढे फाटा गावच्या हद्दीत एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा अक्षरश: पाय तुटून तब्बल ३५ फुटांवर जाऊन पडल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सूरज राजेंद्र बोडके (वय २५, रा. आरफळ, ता. सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सातारा आगाराची गोवेहून साताऱ्याकडे एसटी बस (एमएच ०६-एस ८१३९) येत होती. … Read more

वाई MIDC परिसरात पूर्व वैमस्यातून गोळीबार; एकजण जखमी

Crime News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईच्या एमआयडीसीत पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाला असून गोळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. गोळीबाराच्या घटनेत एक युवक जखमी झाला असून त्याला वाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दि. २४ रोजी रात्री आठ वाजता … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 15 1

सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पालकमंत्री श्री.देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर खेख, … Read more

प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांना ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; ‘समाज कल्याण’च्या सहायक आयुक्तांकडून आवाहन

Satara News 14 1

सातारा प्रतिनिधी । शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु. जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण (Renewal) व नवीन अर्ज नोंदणी (Fresh) दि. 11 ऑक्टोंबर 2023 पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयास संकेतस्थळाद्वारे तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे सदर संकेतस्थळावरुन अर्ज भरुन मंजुरीस्तव सादर … Read more

सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या बैठकीत आले खरेदीवर तोडगा; प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव

Satara News 13 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नवीन आले आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सरसकट आले खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत असल्याने सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नुकतीच एक महत्वाची बैठक घेण्यात आली. … Read more