प्रसिद्ध केळवली धबधब्यात एक जण बुडाला; रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू

Satara news 20240630 203225 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील केळवली धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. रविवारी देखील पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, येथील धबधब्यामध्ये रविवारी दुपारच्या सुमारास एक युवक बुडाल्याची घटना घडली. संबंधित युवक धबधबा पाहण्यासाठी तेथे आपल्या मित्रांसमवेत गेला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, केळवली येथे रविवारी … Read more

वाई तालुका वारकरी पायी आळंदी वारीच्या दिंडींस प्रारंभ

Wai News 20240630 170145 0000

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील महागणपती मंदिरासमोर वाई तालुका वारकरी पायी आळंदी वारीच्या दिंडीस प्रारंभ करण्यात आला. वेळी तालुका वारकरी संघटना, कृष्णामाई पंचक्रोशी सोहळा, कमंडलू पंचक्रोशी पायी दिंडी, धौम्य ऋषी पायी वारी, मेरुलिंग दिंडी सोहळा एकत्र करून सर्व दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान झाले. तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप अशोक महाराज पाटणे यांच्या हस्ते विना पूजन करून … Read more

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागाला दिली भेट

Satara News 20240630 155513 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नेत्रतपासणी शिबीरानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील नेत्र विभागाला भेट दिली. तसेच विभागाची पाहणी केल्यानंतर तेथील कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दिनांक २९ मे २०२४ रोजी केडंबे तालुका जावली या डोंगराळ भागामध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन … Read more

शनिवार अन् रविवारी सुट्टीच्या दिवशीही सातारा सेतू कार्यालय सुरु

Satara News 20240630 150955 0000

सातारा प्रतिनिधी | शाळा, महाविद्यालय तसेच नोकरीसाठी आवश्यक असणारे दाखले काढताना विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जुलै अखेरपर्यंत शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी सातारा सेतू कार्यालय सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले आणि सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी कर्मचार्‍यांना त्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. … Read more

कासच्या पाणीकपात अन् अपुरा पाणीपुरवठ्यामुळे सातारकर झाले हैराण

Satara News 20240630 140235 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराची लाईफलाईन असलेल्या कास तलावामध्ये तब्बल 45 फूट पाणीसाठा आहे. अजूनही म्हणावा तसा पावसाने अपेक्षित जोर धरलेला नसला तरी मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या पूर्व मोसमी दमदार पावसाने कासची पाणी पातळी सहा फुटाने वाढली आहे. तरीही सातारा नगरपालिका पाणी कपातीचे वेळापत्रक मागे घ्यायला तयार नाही. परिणामी कास तलावातून वारंवार होणारा अपुरा पाणीपुरवठा … Read more

जुन्या घराची मातीची भिंत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

Crime News 20240630 071211 0000

सातारा प्रतिनिधी | कवठे, ता. वाई येथे शनिवारी एका जुन्या घराची मातीची भिंत कोसळली. त्यामध्ये ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेने जुन्या धोकादायक घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेश्मा रूपेश पोळ (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तर रूपाली प्रशांत पोळ (वय … Read more

‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मारहाण करून खूनच, पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

Crime News 20240629 194052 0000

सातारा प्रतिनिधी | केळवली, ता. सातारा येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मारहाण करुन खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर तपासादरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून संबंधितांनी कोणत्या कारणातून खून केला याची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश धोंडिबा जांगळे (वय २५) असे … Read more

‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक’ अभियानात फलटण आगाराचा प्रथम क्रमांक

Phalatan News 20240629 110021 0000

सातारा प्रतिनिधी | ‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक’ अभियानात फलटण आगाराचा पुणे प्रदेश स्तरावर प्रथम क्रमांक आला आहे. या अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल बसस्थानकास बक्षीस म्हणून १० लाख रुपये मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट … Read more

Satara Waterfalls : साताऱ्यातील भांबवली वजराई धबधबा फेसाळला; देशातील सर्वाधिक उंचीच्या धबधब्याचे विहंगम दृश्य

Satara News 35 1

सातारा प्रतिनिधी । सध्या मान्सूनमुळे सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या धबधब्यांतून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. सातारा जिल्ह्यातील असे डोळ्याचे पारणे फेडणारे धबधबे (Satara Waterfalls) आहेत. पावसाळ्यात तुम्ही जर फिरायचा प्लॅन करत असाल तर सातारा जिल्ह्यातील देशातल्या सर्वात उंच अशा भांबवली वजराई धबधब्याला तुम्ही नक्की भेट द्या. पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई … Read more

नातेवाईकाच्या घरातून 6 तोळ्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, मुद्देमाल हस्तगत

Satara News 34 1

सातारा प्रतिनिधी । नातेवाईकाच्या घरातील सहा तोळ्याचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने चोरून पळून गेलेल्या महिलेस सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कळंबे (ता. सातारा) येथे अटक केली आहे. तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दीपाली संतोष बोराटे (रा. वडुथ, ता. सातारा) यांनी दि. २१ जून रोजी घरातून त्यांचे 6 तोळे सोने व चांदीचे … Read more

सातारा शहरातील पहिलाच गुन्हा : पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

Satara News 31 1

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण एकनाथ यादव (रा. धादमे कॉलनी, करंजे पेठ, सातारा) अपसंपदेचा सातारा शहरातील बहुदा हा पहिलाच गुन्हा आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोग्य निरीक्षक यादव यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता असल्याची … Read more

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; शेतकऱ्यांनी दिली बाजरीसह भाताला अधिक पसंती

Satara News 26 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सून चांगला बरसल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. जून महिना संपण्यापूर्वीच १ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ५० इतके झाले आहे. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणीचा अंदाज आहे. तर सध्या भात लागण, बाजरी, ज्वारी, मका पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे … Read more