मतदार यादीत Deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही – निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । मतदारयादीत deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. अशी कोणतीही procedure मतदान केंद्रावर होत नसल्याची महत्वाची माहिती सातारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की, ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला … Read more

गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांनी दक्ष राहावे; विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन यांचे निर्देश

Satara News 24

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष खर्च निरीक्षक श्री. बी. आर. बालकृष्णन यांनी नुकताच सातारा जिल्ह्यातील निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. यावेळी निवडणुकीत विविध प्रकारची प्रलोभने, मद्य किंवा पैसे यांच्या आधारावर मतदान होऊ नये. संपूर्ण मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शीपणे व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांनी प्रभावी कामगिरी करावी, … Read more

रामलल्लांच्या दर्शनासाठी सातारा-अयोध्या ST जाणार; 25 नोव्‍हेंबरला 45 भाविक होणार रवाना

Satara News 22

सातारा प्रतिनिधी | अयोध्या येथील रामल्लांची प्राणप्रतिष्ठापनेनंतर दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील भाविक जाणार आहेत. या भाविकांसाठी एसटी महामंडळाने सातारा ते अयोध्या ही थेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्या येथे रामलल्लांच्या दर्शनासोबत शेगाव, काशी, प्रयागराज, अलाहाबाद ही एकाच प्रवासात पाच ठिकाणी साडेसात हजारांत देवदर्शन मिळणे शक्य होणार आहे. येत्या २५ नोव्हेंबरला सातारा येथून पहिली बस जाणार … Read more

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थीची बॉक्सींग व कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णसह कास्य पदकांची कमाई

Satara News 21

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीनी भुसावळ येथे झालेल्या अखिल भारतीय निमंत्रित बॉक्सींग स्पर्धा ०४ सुवर्ण, ०६ रौप्य व ०३ कांस्य पदके प्राप्त केली. तसेच इंदापुर येथे झालेल्या अजिंक्य राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेमध्ये ०१ सुवर्ण, ०१ रौप्य पदके प्राप्त करुन भरघोस यश संपादन केले आहे. दरम्यान, दि.०६/११/२०२४ ते … Read more

शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेचा दारु वाहतुकीवर छापा; 63 हजार 865 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 5

सातारा प्रतिनिधी । शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या वतीने आज मोळाचा ओढा ते बुधवार नाका जाणाऱ्या मार्गावर अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाच्या वतीने अटक करत सुमारे 63 हजार 865 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारु व्यवसायांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक समीर … Read more

जिल्ह्यात 8 हजार 442 भावी शिक्षक उद्या देणार TET चा पेपर; फिंगरप्रिंट, चेहराही स्कॅन होणार

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा उद्या रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे परीक्षा होईल का नाही, अशी भावी शिक्षकांमध्ये धाकधूक होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेची तारीख जाहीर झाली यासाठी जिल्ह्यात परीक्षा केंद्र निश्चित करून तेथे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात … Read more

सातार्‍यातील 93 जण तडीपार; 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर

Crime News 20241109 075942 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका व बोरगाव पोलिस ठाणेअंतर्गत 93 जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी शुक्रवारी दिले. तसेच सातारा शहर, शाहूपुरी व सातारा तालुका पोलिस ठाणेअंतर्गत 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधिकार्‍यांनी सादर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील … Read more

यंदा 51 मुहूर्त; तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार !; 18 नोव्हेंबरपासून विवाह इच्छुकांच्या डोक्यावर पडणार अक्षता

Marriage News

सातारा प्रतिनिधी । नुकताच दिवाळीचा सण झाला. सर्वांनी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. दिवाळीनंतर तुलसी विवाह जवंजाळ आला असून आपल्याकडे तुळशी विवाह आटोपल्यानंतर लग्नाचे बार उडण्यास प्रारंभ होतो. लग्नाचे मुहूर्त ही त्याच पद्धतीचे असतात. यंदा १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी असून दुसऱ्या दिवसांपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. तर १८ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होणार … Read more

सोशल मीडियावर समर्थकांच्चा रंगतोय सामना; आरोप-प्रत्यारोपांतून मतदारांचे होतेय मनोरंजन

Satara News 40

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आरोप- प्रत्यारोपांनी हळूहळू वातावरण गरम होऊ लागले आहे. सोशल मीडियावर तर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल वॉर सुरू झाले आहे. व्हॉट्सअॅप, उजाडल्यापासूनच फेसबूकवर एकमेकांविरोधात पोस्ट करून एकमेकांची उणी दुणी काढली जात आहेत. उमेदवार या सर्व गोष्टींपासून दूर … Read more

प्रचारासाठी जीप 3900 तर वाहनरथ 5 हजाराचा दर; निवडणूक आयोगाने खर्चासाठी वाहनांचे दर केले निश्चित

Satara News 41

सातारा प्रतिनिधी | राज्यात २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारात उमेदवारांना वापराव्या लागणाऱ्या वाहनांसाठी निवडणूक आयोगाने दर निश्चित केले आहेत. जीप, टाटा सुमो, तवेरा या चारचाकी वाहनांसाठी ३९०० रुपये दर आहेत. तर रॅली, वरातीच्या रथासाठी ५ हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याची मर्यादा आयोगाने घातली आहे. दुचाकी ११०० … Read more

कंटेनरला कारची पाठीमागून धडक; रायगावात अपघातात कार चालकाचा मृत्यू

Crime News 20241106 085721 0000

सातारा प्रतिनिधी | रायगाव (ता. सातारा) हद्दीत महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक बसली. या घटनेत कारचालकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. दिलीप भास्कर सातपुते (वय २९, रा. नागोळे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), सुरेखा अशोक होलमुखे (वय ४७, रा. करवडी, ता. सातारा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. कारचालक दिलीप भास्कर सातपुते … Read more

जिल्ह्यातील 488 ग्राहकांच्या वीजबिलांचे चेक बाऊन्स; 3 लाख 66 हजारांचा दंड

Satara News 20241105 210758 0000

सातारा प्रतिनिधी | वीजबिलाचा भरणा करण्यासाठी दिलेला धनादेश न वठल्यामुळे (चेक बाऊन्स) जिल्ह्यातील ४८८ ग्राहकांना तीन लाख ६६ हजार रुपयांचा बँक चार्जेसचा भुर्दंड बसला आहे. विविध कारणांसाठी धनादेश वठत नसल्यामुळे ग्राहकांनी महावितरणचा वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइनसह अन्य पर्यायांचा वापर करणे आवश्यक आहे. महावितरणने वीजबिल ‘भरण्यासाठी ‘ऑनलाइन’द्वारे विविध पर्याय उपलब्ध केलेले आहेत, तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष रोख … Read more