कोरेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार; आमदार शशिकांत शिंदेंची मोठी घोषणा

Shahikant Shinde News 20240802 180625 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेक पक्षांच्या नेत्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेत कोरेगाव मतदारसंघातून मी लढणार असल्याची घोषणा केली. ‘काहीही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंच्या विरोधात याचिका करणाऱ्या देशमुख यांच्या घरावर ED चा छापा

Jaykumar Gore News 20240802 162116 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या दीपक देशमुख यांच्या घरावर आज सकाळच्या सुमारास ईडीने छापा टाकला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणीतील मायणी मेडिकल कॉलेजचे सर्वेसर्वा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे पथक मायणीत दाखल झाले. देशमुख कुटुंबातील सदस्यांची चौकशी सकाळी सहापासून सुरू होती. मायणी येथील श्री … Read more

‘लोकशाहिरां’च्या भारतरत्न पुरस्काराची शिवेंद्रसिंहराजेंची फडणवीसांकडे मागणी

Shivendraraje Bhosale News 20240802 114107 0000

सातारा प्रतिनिधी | मुंबई येथे भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दलित साहित्याचे संस्थापक असलेल्या लोकशाहिरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही मोलाची भूमिका बजावली आहे. अशा या थोर समाजकारणी, लोकहितवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. … Read more

भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ 300 फूट गणेश खिंडीत कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

Car Accident News 20240802 080725 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा परिसरातील यवतेश्वर घाटाजवळील असणाऱ्या गणेश खिंडीत स्कॉर्पिओ गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये सात प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चालकाचे नियंत्रण सुटून गाडी दरीत गेली. या गाडीमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते. … Read more

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक; 4 लाख 28 हजार किमतीच्या 6 दुचाकी जप्त

Crime News 5

सातारा प्रतिनिधी । बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास अट्टल दुचाकी चोरट्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. यावेळी चोरट्याकडून एकुण 4 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या 6 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. संभाजी बबन जाधव (वय 39, रा. अतीत ता. जि.सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस … Read more

सातारा जिल्ह्यात आढळला कोरोनाचा एक संशयित रुग्ण; डॉक्टरांनी केलं महत्वाचा आवाहन

Corona News

सातारा प्रतिनिधी । महाभयंकर अशा कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. या कोरोनामुळे सातारा जिल्ह्यात देखील हाहाकार मजला होता. दरम्यान, सातारा जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा एक संशयित रुग्ण परजिल्ह्यांतून दाखल झाला असून, त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी काेरोनाने अनेक लोकांचा जीव घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ही … Read more

बेळगावी-मिरज विशेष पूर रेल्वे साताऱ्यापर्यंत वाढवा; गोपाल तिवारींचे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन

Railway News

सातारा प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्याकडे निवेदनद्वारेकेली असल्याची माहिती विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयूसीसी) सदस्य गोपाल तिवारी यांनी … Read more

देऊर रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; अशी राहणार वाहतूक व्यवस्था सुरू

Satara Deur Relway Gat News 20240731 141703 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे- मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ दुरूस्ती व निरीक्षणासाठी देऊर तालुका कोरेगाव येथील सातारा- लोणंद, पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट आज, बुधवार (दि. ३१) व गुरूवार दि. १ ऑगस्टच्या रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढली. मध्य रेल्वेच्या वाठार स्टेशन येथील उपमुख्य … Read more

साताऱ्यातील 195 वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव लागला वाहू; पश्चिम भागाचा पाणीप्रश्न अखेर निकाली

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तलाव, ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा सुमारे १९५ वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने सहा वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढलयामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झाली आहे. … Read more

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन होणार ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’!

Satara News 20240730 213143 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने एक प्रसिद्धी पत्रक काढून महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने … Read more

कावीळ विषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे – डॉ. युवराज करपे

Satara News 24

सातारा प्रतिनिधी । २८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने समाजामध्ये कावीळ आजाराविषयी जनजागृती व्हावी यसाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राहुल देव खाडे, डॉ.सुभाष कदम, डॉ.राहुल जाधव, डॉ.रामचंद्र जाधव, डॉ.चंद्रकांत काटकर, सहाय्यक अधीपरीचारिका प्रतिभा चव्हाण, प्रा.अमोल … Read more

आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डूडी यांच्या बोगस डॉक्टर विरोधात महत्वाच्या सूचना

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने यंत्रसामुग्री खरदीचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. हे डॉक्टर शोधण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर शोधण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशा महत्वाच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली … Read more