जिल्हा प्रशासनाच्या संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

Phalatan News 20240708 073557 0000

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या विविध योजनांची व जन कल्याणकारी योजनांची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. लोणंद, ता. खंडाळा येथे आजपासून संवाद वारी उपक्रमाचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात चित्ररथ, पथनाट्य, कला पथक आणि प्रदर्शन या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरीता सातारा पोलीस दल सज्ज

Satara News 20240705 181555 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या दि.०६/०७/२०२४ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि.११/०७/२०२४ रोजी कालावधीमध्ये सातारा जिल्हयातून लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मार्गाने पालखी मार्गक्रमन होणार आहे. दि.०६/०७/२०२४ रोजी निरा पुल येथे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्हयात आगमन होणार असून नमुद पालखी सोहळ्यास सुमारे ५ ते ६ लाख वारकरी … Read more

माऊलीची संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करा : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Phalatan News 20240705 154027 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तरडगाव येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाहणी केली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे … Read more

दहिवडी पोलिसांनी रोडरोमिओंची काढली धिंड, 21 हजाराचा दंड केला वसूल

Crime News 20240705 102212 0000

सातारा प्रतिनिधी | दहिवडी पोलिसांनी रोडरोमिओंना मोठा दणका दिला आहे. बसस्थानक, शाळा, कॉलेजच्या परिसरात मोटरसायकलवरून फिरणाऱ्या रोडरोमिओंना ताब्यात घेवून त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. पोलीस ठाण्यात नेवून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरूणांना पोलीस ठाण्याकडे नेतानाचा व्हिडिओ दहिवडी परिसरात चांगलाच व्हायरल झाला आहे. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी … Read more

शासकीय यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून वारकऱ्यांची काळजी घ्यावी : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Phaltan News 20240704 082105 0000

सातारा प्रतिनिधी | संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सातारा जिल्ह्यातील वास्तव्यादरम्यान शासकिय यंत्रणेच्या प्रत्येक विभागाने स्वच्छता, पाणी, आरोग्य, रस्ते, वीज, इंधन पुरवठा आदी महत्वपुर्ण बाबींमध्ये वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्ष रहावे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डूडी यांनी नुकतीच लोणंद, तरडगाव, फलटण पालखी तळ आणि सोहळ्याच्या … Read more

फलटण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई

Crime News 20240703 150019 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. यामध्ये ४ लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचे आदेश दिले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक नवनाथ फडतरे यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी गायकवाड म्हणाले की, ”कृषी … Read more

एसीबीकडून सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर 17 लाख 84 हजाराच्या अपसंपदेचा गुन्हा दाखल

Crime News 20240702 190502 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील बरड पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप महादेव नाझीरकर (वय ५५, रा. बारामती, जि. पुणे), असे संशयिताचे नाव आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

धबधब्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 20240702 111215 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळ्यामध्ये पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जातात व पर्यटनाचा आनंद घेतात. पर्यटकांनी धबधब्याचा आनंद घेत असताना स्वतःच्या जीविताची काळजी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी सातारा येथे धबधब्याच्या ठिकाणी एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी डूडी … Read more

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढविणे सहज शक्य : दत्तात्रय गायकवाड

Phalatan News 20240701 190326 0000

सातारा प्रतिनिधी | कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये फलटण तालुका अग्रेसर असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आर्थिक उन्नती साधने सहज शक्य आहे, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सतत पाठीशी आहे.असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले. शेरेचीवाडी(ढवळ) ता. फलटण येथे हरितक्रांतीचे प्रणेते … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्व, बैलांची वैद्यकीय तपासणी केली जाणार

Satara News 20240701 180715 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 6 ते 11 जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करताना पालखीसोबत असणारे अश्व, बैल यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मार्गावर लोणंद पालखी, तळ, तरडगाव पालखी तळ, फलटण … Read more

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी करीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Phalatan News 20240701 160551 0000

सातारा प्रतिनिधी | संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित जिल्हा प्रशासनाकडून पालखी स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत. या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, फलटणचे उपविभागीय पोलीस … Read more

संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे प्रबोधनात्मक कार्य, यशस्वीतांचा गुणगौरव प्रेरणादायी : भाग्यश्री फरांदे

Satara news 20240701 132324 0000

सातारा प्रतिनिधी | दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे सातत्यपूर्ण असणारे प्रबोधनात्मक कार्य, यशस्वीतांचा गुणगौरव प्रेरणादायी असल्याचे सातारच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे यांनी स्पष्ट केले. दुधेबावी, ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत यूपीएससी, एमपीएससी परीक्षेतील यशस्वीतांना राज्यस्तरीय यशवंत पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी सातारा विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र … Read more