फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दोन्ही राजे बंधूंवर साधला निशाणा; म्हणाले, त्यांचे मानसिक स्वास्थ्य…

Ranjit Naik Nimbalakar News 20240724 203651 0000

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून जे मला मताधिक्य मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे श्रीमंत रामराजे व त्यांच्या दोन्ही बंधूंसह संपूर्ण राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असल्याची बोचरी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. … Read more

राज्यात नवीन 53 अपर तहसील कार्यालय; सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचा समावेश

Satara News 20240717 092304 0000

फलटण प्रतिनिधी | राज्यातील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेले नागरीकरण, वाढलेली लोकसंख्या, विकासात्मक कामे, जमिनींविषयक वाढते दावे आदी कारणांमुळे राज्यात नवीन 53 अपर तहसील कार्यालय निर्मितीचे प्रस्ताव महसूल विभागाकडे दाखल झाले आहेत. याला मान्यता मिळाल्यास मोठ्या तालुक्यांचे विभाजन करून तेथे अपर तहसील कार्यालय स्थापन होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय दूर होणार असून कामे गतीने … Read more

दिंडीसोबत चालत असलेल्या ज्येष्ठ वारकऱ्याला पाठीमागून ट्रकची धडक; जागीच मृत्यू

Phalatan News 20240712 080439 0000

सातारा प्रतिनिधी | दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकऱ्याला धडक दिली. त्यानंतर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात विडणी, ता. फलटण येथे बुधवार, दि. १० रोजी सकाळी साडेअकरा वाजता झाला. मोतीराम तुळशीराम तायडे (वय ७८, रा. मसला खुर्द, जि. बुलढाणा), असे अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

फलटण येथील पालखीतळी स्वच्छता मोहिम; संजीवराजे नाईक निंबाळकरांनी घेतला सहभाग

Phalatan News 1

सातारा प्रतिनिधी । श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या फलटण येथील पालखीतळी आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ सातारा जिल्ह्या परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी निंबाळकर यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छता केली. यावेळी विविध पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजीवराजे … Read more

कृषी विभागाने काढली वडजलपासून फलटणपर्यंत टाळमृदुंगाच्या गजरात दिंडी

Phalatan News

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे औचित्य साधून फलटण, जिल्हा सातारा येथे शेतकर्‍यांना विविध योजनेची माहिती देणारे चित्ररथ व दिंडीच्या माध्यमातून कृषी योजनेचा शेतकर्‍यांमध्ये जनजागृती उपक्रम जिल्हा कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आला. यावेळी फलटण कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वडजलपासून फलटण कृषी कार्यालयापर्यंत टाळमृदुंगाच्या गजरात दिंडी काढली. यावेळी काढलेल्या या दिंडीमध्ये पाणी … Read more

‘माऊली’च्या वारीत आरोग्य विभागाकडून 59 हजार वारकऱ्यांवर औषधोपचार!

Phaltan News 20240710 212942 0000

सातारा प्रतिनिधी | आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सातारा जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज आहे. वारीमार्गावर सातारा जिल्हा हद्दीत प्रत्येक एक किलोमीटरवर रुग्णवाहिका उभी आहे. तर जिल्ह्यातील चार दिवसांच्या मुक्कामात आतापर्यंत तब्बल ५९ हजार वारकऱ्यांवर आैषधोपचार करण्यात आले आहेत. तसेच १८९ जणांना दाखल करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज … Read more

फलटणमध्ये उद्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

Phalatan News 20240710 191753 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण … Read more

माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

Phalatan News 20240710 135033 0000

सातारा प्रतिनिधी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये वारीतील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला. फलटण मधून सकाळी माऊलींची पालखी बरडच्या दिशेने मुक्कामासाठी जात असते. जाताना … Read more

माऊलींच्या पालखीचे फलटण तालुक्यात जल्लोषात स्वागत

Phalatan News 20240709 071417 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यामध्ये कापडगाव येथील सरहद्देच्या ओढ्यावर आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोणंद येथील अडीच दिवसांचा मुक्काम संपवून आज माऊलींच्या पालखीचे फलटण तालुक्यात आगमन झाले. माऊलींच्या पालखीचा मुक्काम सोमवारी तरडगाव येथे पार पडल्यानंतर आज पालखीचा मुक्काम फलटण … Read more

माऊलीची पालखी आज फलटण तालुक्यात होणार दाखल; चांदोबाचा लिंबमध्ये पार पडणार पहिले उभे रिंगण

Satara News 20240708 142012 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी दुसऱ्या दिवशीही रविवारी लोणंदनगरीत विसावला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक लोणंदमध्ये जाऊन माउली चरणी नतमस्तक झाले. लोणंद येथील मुक्काम आटोपून सोहळा सोमवारी दुपारी तरडगावकडे मार्गस्थ झाल्यावर सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर चांदोबाचा लिंब येथे वारीतील … Read more

सह्याद्री चिमणराव कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार?

Phalatan News 20240708 092904 0000

सातारा प्रतिनिधी | फलटणचे माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री चिमणराव कदम हे आगामी काळामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कदम यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सद्या फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. काही दिवसांनी बारामती तालुक्यातील निंबुत येथे काकडे कुटुंबीयांच्या … Read more

पालखी सोहळ्यात जिल्ह्यातील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 1800 फिरती शौचालये उपलब्ध

Phalatan News 20240708 081902 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात प्रशासनाकडून जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्चच्छता विभागाच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी अठराशे फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याठिकाणी वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात लाेणंद … Read more