फलटण मतदारसंघात एकुण 71.05% मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Phalatan News 20241120 210911 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली आहे. यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद झाले अर्थात ईव्हीएम मध्ये लॉक झाले आहे. दरम्यान, दिवसभरात फलटण मतदारसंघात एकुण 71.05% मतदान पार पडले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 3 लाख 39 हजार 662 मतदारांपैकी एकूण 2 लाख 41 हजार 329 … Read more

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर

Satara News 80

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे मतदान पार पडले. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान चांगल्या प्रकारे पार पडले. दरम्यान, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली होती. फलटण – कोरेगाव विधानसभा निवडणूक कार्यालयामध्ये … Read more

सातारा अन् फलटणमध्ये शांततेत मतदान सुरू; पोलिसांकडून ड्रोनद्वारे मतदानाच्या हालचालींवर लक्ष

Satara News 68

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात उत्साह पूर्ण वातावरणात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान झाले. दरम्यान, जिल्ह्यात मतदान केंद्र परिसर व मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील प्रतापसिंहनगर या ठिकाणी देखील सातारा पोलिसांकडून … Read more

सातारा जिल्ह्यात विधानसभेसाठी मतदानास सुरुवात; 3 हजार 165 मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी

Satara News 20241120 092031 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सदर मतदान प्रक्रिया पार जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवरून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरशीच्या लढती … Read more

पहिल्यांदाच मतदान करताय..? थांबा… अगोदर ‘हे’ वाचा आणि मग मतदानाला जा…

Satara News 20241120 073533 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यासह सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान सुरू झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आता तुम्ही नवमतदार असाल तर, मतदान कसं करायचं, मतदान … Read more

देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; कार कालव्यात पलटी होऊन चारजण जागीच ठार, 7 गंभीर जखमी

Crime News 20241118 112759 0000

सातारा प्रतिनिधी | वाखरी- शिरढोण बायपास मार्गावर शिरढोणमध्ये कालव्यात भरधाव चारचाकी मोटार पलटी होऊन पवारवाडी (ता. फलटण) येथील चार जण जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. एकनाथ दत्तू निंबाळकर, शोभा धनाजी कान्हेरकर, विराज ऊर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर व चालक सुदाम तानाजी नलवडे (सर्व रा. … Read more

फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती

Phalatan News 3

सातारा प्रतिनिधी | फलटण बसस्थानक येथे मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती व मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे, नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव उपस्थिती होते. यावेळी नोडल अधिकारी फलटण यांनी मतदान बुधवार दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ७ ते सायं. ६ दरम्यान मतदान करण्यासाठी घराबाहेर पडून हक्क बाजवण्याबाबत … Read more

अजितदादांची उद्या फलटणमध्ये सभा; नेमकं काय बोलणार?

Ajit Pawar News 20241116 090717 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्या फलटण दौऱ्यावर येत आहेत. उद्या, रविवार, दि. 17 रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. … Read more

मतदान केंद्रांवर मतदारांना सर्व सुविधा उपलब्ध करा : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले

Phaltan News 2

सातारा प्रतिनिधी | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना सर्व सुविधा म्हणजेच पिण्याचे पाणी, टॉयलेट्स, स्वच्छतागृहांची स्वच्छता, प्रथमोपचार यंत्रणा, सुरळीत विद्युत पुरवठा, आवश्यक असणाऱ्या मतदारांना रिक्षा, व्हील चेअर उपलब्ध करून द्यावेत अशी सूचना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत. फलटण … Read more

जिल्ह्यात नेत्यांच्या धडाडणार तोफा; पवार, ठाकरे, गांधींसह गडकरी, योगी, फडणवीसांची सभा

Satara News 20241114 100447 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सातारा जिल्ह्यातील चुरशीच्या लढती होणाऱ्या मतदारसंघांत दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभातून तोफा धडाडणार आहेत. यामध्ये महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, तर महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, अमोल कोल्हे … Read more

मतदार जनजागृतीसाठी फलटणमध्ये मानवी साखळीमधून साकारला महाराष्ट्राचा नकाशा

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी 1 हजार विध्यार्थी, युवक व मतदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशामध्ये फलटण 100 टक्के मतदान रांगोळीच्या व मानवी साखळी द्वारे करण्यात आले तसेच मानवी साखळी द्वारे जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. फलटण येथील … Read more

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम!

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील चार नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असताना राज्याच्या प्रमुखपदाची भूमिका बजावली. तर, बाबासाहेब भोसले आणि एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मात्र, त्यांना देखील राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली … Read more